

सकाळी उठल्याबरोबर शौचाला जाणं ही आरोग्याच्या दृष्टीने एक चांगली सवय असते. मात्र अनेकांना सकाळी शौचाला जाण्याची सवय नसते. तर ऑफिसला जाण्यापूर्वी फ्रेश वाटावं म्हणून लोकं ही सवय लावून घेतात. ऑफिसमधील कम्युनल बाथरूममध्ये टॉयलेटला जाण्याचा विचारसुद्धा काहींना अस्वस्थ करतो. जर तु्म्हीही असा विचार करत असाल तर तुम्ही एकटे नाही आहात.
सर्वेक्षण सांगतं की, जवळपास एक-तृतीयांश कर्मचारी ऑफिसमध्ये शौचाला जात नाहीत. तर प्रत्येक पाचपैकी एकजण तर ऑफिसध्ये शौचाला जाणं पूर्णपणे टाळतो. याचं कारण म्हणजे प्रायव्हसीची कमतरता, दुर्गंधी, आवाज आणि शेजारी कोणी असल्याची लाज.
मात्र यावेळी तज्ज्ञांनी आपल्याला काही टीप्स दिल्या आहेत. ज्या टीप्सचा वापर करून तुम्ही ऑफिसला जाण्यापूर्वीच आरामात पोट साफ करू शकता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाचं शरीर घड्याळासारखं चालेल असे नाही, पण काही सवयी नक्कीच आहेत ज्या शरीराला एक सोपा, नियमित पॅटर्न देऊ शकतात आणि हे सर्व जीवनशैलीपासून सुरू होते.
नियमित आणि ठराविक वेळी शौचाला जाणं हे मुख्यतः तुमच्या रोजच्या सवयींचे परिणाम असतात. संशोधन सांगतं की, तुम्ही किती वेळा टॉयलेटला जाता, हे तुमच्या एकूण आरोग्याचेही संकेत असतात. काही अभ्यासांमध्ये आढळलंय की, दिवसातून एक ते दोन वेळा शौचाला जाणं हे शरीरासाठी सर्वात योग्य मानण्यात येतं.
नियमित शौचासाठी सर्वात पहिली गरज म्हणजे पुरेशा प्रमाणात फायबर. फायबर स्टूलला मऊ बनवतं, ज्यामुळे ते सहज बाहेर पडू शकतं. तसंच हे कोलनची चांगली साफसफाई करतं आणि जमा झालेली घाण आणि बॅक्टेरिया दूर करण्यात मदत करतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 95 टक्के प्रौढ व्यक्ती रोजच्या फायबरची गरज पूर्ण करत नाहीत. तज्ज्ञ दररोज किमान 25 ग्रॅम फायबर घेण्याचा सल्ला देतात.
जर तुम्हाला ऑफिसला जाण्यापूर्वीच शौचाला जायचं असेल तर सकाळी उठल्यावर सर्वात पहिले काम पाणी पिणं हे आहे. यामध्ये कॉफी पिऊ नका. पुरेसे पाणी स्टूलला मऊ ठेवते आणि ते सहज बाहेर पडते.
थोडीफार हालचालही आतडे एक्टिव्ह राहतात. यासाठी सकाळी धावायला जाण्याची गरज नाही. काही हलकी योगासन जसं की, सीटेड स्पाइनल ट्विस्ट, फॉरवर्ड फोल्ड, योगा स्क्वॅट. या सर्वांमुळ आतड्यांची हालचाल वाढते.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.