Why do feel short of breath while climbing stairs : सध्याच्या धावपळीच्या जीवनात बहूतेक लोक त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याने त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. सर्वांचं आयुष्य एवढं धावपळीचं झालं आहे की कोणालाही स्वस्थ बसायला वेळ नाही. तसेच बैठी जीवनशैली, वाईट खाण्यापिण्याच्या सवयी आणि शारीरिक निष्क्रियता यांमुळे वजन वाढते, लठ्ठपणा येतो आणि लोकांचे हाल होतात, बरेचसे लोक आतून कमकुवत होतात. त्यामुळे आजकाल बहुतेक लोक जिना चढण्याऐवजी लिफ्टचा वापर करण्यास प्राधान्य देतात.
3 ते 4 मजल्यांच्या पायऱ्या चढून गेल्यावर धाप लागणे कॉमन बाब आहे. पण काहींना जिना चढताना दम लागतो. अगदी चार- सहा पायऱ्या चढल्या तरी दम (Asthma) लागतो. ही समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये आढळते. असं होत असेल तर हे नॉर्मल नाही. आपल्याला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला तर ही बाब हलक्यात घेऊ नका. यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे दमा किंवा इतर प्रॉब्लेम.
पायऱ्या चढताना धाप का लागते?
श्वसन प्रणालीला शरीरातून कार्बन डायऑक्साइड काढून ऑक्सिजन (Oxygen) पुरवण्यासाठी फुफ्फुस, मेंदू आणि छातीच्या स्नायूंचे कार्य नीट होण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही पायऱ्या चढताच तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर ते ऍलर्जी किंवा दम्यामुळे होऊ शकते.
बऱ्याचदा असे घडते की काही पायऱ्या चढल्यावर आपल्याला धाप लागते, हे काही सामान्य लक्षण नाही, यामागे इतर अनेक कारणे दडलेली असू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात पोषक आणि उर्जेची कमतरता. अनेक वेळा पोषक तत्त्वे मिळाल्यानंतरही लोक शरीराची क्रिया करून थकतात, हे अंतर्गत आजाराचे लक्षणही असू शकते. यामागील कारण निद्रानाश, मानसिक आजार आणि अशक्तपणा (Weakness) असू शकतो, ज्यामुळे लवकर थकवा येतो.
या गोष्टींचे विशेष काळजी घ्या -
आपल्या शरीराचे वजन सामान्यपेक्षा जास्त होऊ देऊ नका.
झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.
दररोज पूर्ण झोप घ्या आणि दिवसा झोपण्याची सवय टाळा.
सकस आहार घ्या आणि पौष्टिक आहार घ्या.
नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.
समस्या कायम राहिल्यास काय करावे?
एवढं करूनही जर श्वासोच्छवासाची समस्या कायम राहिली तर त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हे क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमचेही लक्षण असू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.