Surabhi Jayashree Jagdish
चाणक्य नीती सांगते की, दुपारच्या वेळी झोप घेऊ नये. दुपारची झोप ही हानीकारक झोप मानली जाते.
निरोगी शरीरासाठी व्यक्तीला दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते, पण ती रात्रीची असावी.
चाणक्यांच्या मते जे लोक दिवसा झोप घेतात त्यांचा अकाली मृत्यू होतो. कारण झोपेत असताना श्वास लांबला जातो आणि शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतो.
तसंच दिवसा झोपणाऱ्या लोकांना जीवनात काही साध्य करण्याची इच्छा राहत नाही. त्यामुळे तुम्ही आळशीही बनू शकता.
अशा लोकांची ताकद आणि चपळता दिवसेंदिवस कमी होत जाते. दुपारी झोपल्याने हृदयाची धडधड अनियमित होते, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
ज्योतिषशास्त्रातही दुपारच्या झोपेमुळे आर्थिक स्थिती बिघडते असं सांगितलंय. दुपारची झोप नकारात्मकता निर्माण करते. यामुळे शरीराला हानी होते आणि मानसिक त्रासही वाढतो.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीत नमूद केले आहे की रात्री झोपण्याऐवजी दुपारी झोपल्यास संकटे आणि समस्या उद्भवू शकतात.