Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

NCP MLA Sunil Shelke Campaigns For Congress : महायुती आघाडीतील संघर्ष तीव्र झाला आहे. भाजपला रोखण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके हे काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार करत आहेत. त्यांनी काँग्रेसला उघड पाठिंबा दिल्याने राजकीय वादाचं वादळ उठलंय.
NCP MLA  Sunil Shelke Campaigns For Congress
NCP (Ajit Pawar) MLA Sunil Shelke campaigns for a Congress candidate in LonavalaSaam Tv
Published On
Summary
  • भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसला साथ

  • महायुतीतील विचारधारा आणि एकजूट ढासळली आहे.

  • अजित पवार यांच्या आमदाराकडून काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार सुरू

राजकीय नेत्यांनी विचारधारा खुंटीला टांगून सत्तेसाठी काहीपण, अशी भूमिका घेतल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. महायुतीत सत्तेत असतानाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार काँग्रेसचा प्रचार करत आहेत. हे आमदार कोण आहेत. आणि भाजपविरोधात कसा संघर्ष सुरुय. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

गळ्यात काँग्रेसच्या उपरणं घालून काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरणारे हे आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके. लोणावळ्यात भाजपला रोखण्यासाठी सुनील शेळकेंनी कंबर कसलीय. एवढंच नाही तर आपण स्वतः महायुतीत आहोत याचा विसर पडल्याप्रमाणे सुनील शेळकेंनी थेट काँग्रेसचा विचार टिकवण्यासाठी उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय.

खरंतर अजित पवारांची राष्ट्रवादी सत्ताधारी महायुतीत आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कधी, कसं समीकरण तयार होईल, सांगता येत नाही. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे वाभाडे काढणारे, एकमेकांचे करियर उद्ध्वस्त करण्याची भाषा करणारे नेते एकत्र आलेत. मात्र एकमेकांचे कट्टर दुश्मन नेमके कुठं एकत्र आलेत? पाहूयात.

NCP MLA  Sunil Shelke Campaigns For Congress
Local Body Election: मत नाही तर निधी नाही; नेत्यांची गुंडगिरी, मतदारांना धमक्या?

शिराळा आणि जयसिंगपूरमध्ये शिंदेसेनेविरोधात़ धनंजय महाडिक-सतेज पाटील एकत्र

चाकणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात शिंदेसेना आणि ठाकरेसेना एकत्र

कणकवलीमध्ये शिंदेसेना-ठाकरेसेना एकत्र

कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र

NCP MLA  Sunil Shelke Campaigns For Congress
कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या युतीची खिचडी शिजली; कट्टर विरोधक आले एकत्र, कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

राज्यात पक्ष आणि विचारधारेवर निवडणुका लढवल्या जायच्या. मात्र आता सत्तेचा मलिदा खाण्यासाठी नैतिकता, पक्ष, विचारधारा खुंटीला टांगून एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करणारे नेते एकत्र आल्यानं निवडणुकीचा चोथा झाल्याचंच चित्र आहे. त्यामुळं जनता सोयीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांना साथ देणार की दणका? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com