Relationship Tips saam tv
लाईफस्टाईल

Toxic Men: महिलांचं टॉक्सिक पुरुषांकडे अधिक आकर्षण का असतं? जाणून घ्या काय आहेत कारणं

Relationship Tips: बर्‍याच महिलांना स्वतःसाठी योग्य जोडीदार निवडण्याऐवजी टॉक्सिक पार्टनरकडे अधिक आकर्षण वाटतं. हे टॉक्सिक संबंध नेहमीच महिलांच्या आयुष्यात तणाव, संघर्ष आणि असुरक्षितता निर्माण करतात.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, मुलगा कितीही टॉक्सिक असेल तरी मुलगी रिलेशनशिप वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते. मात्र असं का होतं, मुलींना टॉक्सिक मुलं आवडू लागतात. तुम्ही या गोष्टीचा कधी विचार केला आहे का?

अनेक महिला स्वतःसाठी चांगला जोडीदार शोधण्याऐवजी टॉक्सिक जोडीदार शोधणं पसंत करतात. टॉक्सिक लोक नेहमीच त्यांच्या पार्टनर्सना ताणतणाव, आयुष्यातील संघर्ष आणि असुरक्षितता देतात. त्यामुळे महिलांची मानसिक स्थिती देखील बिघडू लागते. मात्र असं का होतं, मुलींना टॉक्सिक मुलंच का आवडतात, याची कारण काय असतात ते जाणून घेऊया.

कुटुंब

अनेक महिलांसाठी, त्यांच्या कौटुंबिक इतिहासाचा नातेसंबंधांवर मोठा परिणाम होतो. जर एखाद्या मुलीचं योग्य पद्धतीने संगोपन झालं नसेल तर तिला नातेसंबंधांमध्ये खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे त्या मुलीला टॉक्सिक रिलेशनशिप सामान्य वाटते. परिणामी ती अशा मुलांच्या प्रेमात देखील पडते.

प्रेमाचा शोध

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आत्मसन्मान कमी असतो तेव्हा तो नेहमीच प्रेमाच्या शोधात असतो. त्यामुळे तिला या लोकांशी संपर्क साधायला आवडतं. ज्यांच्यासोबत या टॉक्सिक व्यक्ती त्यांच्या भावनिक गरजांचा फायदा घेतात.

चांगलं वागण्याची इच्छा

काही मुलींना असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला आपण आपल्या प्रेमाने बदलू शकतो. आपण त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करून त्याला एक चांगला व्यक्ती बनवू शकते. याच कारणामुळे अनेक महिला टॉक्सिक पुरुषांच्या प्रेमात पडतात.

भावनिकरित्या कमकुवत असणं

काही महिला या भावनिकरित्या कमकुवत असतात. ज्या कारणाने त्या टॉक्सिक पुरुषांकडे आकर्षित होतात. काही चुकलं जरी असेल तरी अशा महिला दुसऱ्यांचे इमोशन हर्ट करण्यासाठी घाबरतात. त्यामुळे चुकीच्या गोष्टी देखील त्या सहन करतात.

टीप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT