स्ट्रोकवरील उपचारांसाठी नवी पद्धत ठरतेय फायद्याची; पाहा काय आहे सेल बेस थेरेपी?

Cell Based Therapy Stroke: जेव्हा स्ट्रोक येतो तेव्हा डॉक्टर सुरुवातीला पारंपारिक उपचारांसह कृती करण्यास सुरुवात करतात. इस्केमिक स्ट्रोकसाठी, रक्त गोठणे कमी करणारी औषधे किंवा रक्त पातळ करणारी औषधे देऊन ब्लॉकेजेस दूर केली जातात.
Cell Based Therapy Stroke
Cell Based Therapy Strokesaam tv
Published On

मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडीत झाल्यास पक्षाघाताचा झटका येतो. मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्याला अडथळा आला तर याला पक्षाघात किंवा ब्रेन स्ट्रोक म्हणतात. रक्तप्रवाह कमी होणे किंवा हॅमरेज म्हणजे रक्तस्राव यामुळे पक्षाघात होतो. याचे तीन मुख्य प्रकार आहेत: इस्केमिक स्ट्रोक (रक्तप्रवाह रोखणाऱ्या गाठीमुळे), हेमोरेजिक स्ट्रोक (मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव), आणि ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक (टीआयए) म्हणजेच एक "मिनी-स्ट्रोक" जो तात्पुरता असतो परंतु येणाऱ्या मोठ्या संकटाचा इशारा देतो. स्ट्रोकमध्ये वेळच सर्वकाही असते, जलद उपचार हा एखाद्याचा अमुल्य जीव वाचवू शकतो.

वेळीच लक्षणे ओळखा

रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. प्रदीप महाजन यांनी सांगितलं की, खालील लक्षणं दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचारास सुरुवात करा.

  • एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.

  • हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.

  • तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.

  • अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

  • एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.

  • चक्कर येणे, तोल जाणे.

Cell Based Therapy Stroke
Pig Liver Transplant: डॉक्टरांचा नवा चमत्कार, पहिल्यांदाच माणसाच्या शरीरात प्रत्यारोपित केलं डुकराचं लिव्हर

पारंपारिक उपचार कोणते?

हेमोरेजिक स्ट्रोकमध्ये शस्त्रक्रियेने फुटलेल्या रक्तवाहिन्या दुरुस्त करता येऊ शकते. या पद्धती अर्धांगवायू, स्मरणशक्ती कमी होणे आणि इतर गुंतागुंत कमी करतात. परंतु त्या परिपूर्ण नाहीत, औषधांनी चक्कर येणे किंवा मळमळ होऊ शकते आणि या शस्त्रक्रियेमध्ये संसर्गासारखे धोके असतात. शिवाय, जर तुम्ही नंतर तुमची जीवनशैली बदलली नाही (आहार-विहार) तर मात्र पुन्हा स्ट्रोकची भिती नाकारता येत नाही.

रिजनरेटिव्ह मेडिसिन

स्ट्रोकनंतर रिजनरेटिव्ह मेडिसिन एक गेम-चेंजर ठरते. लक्षणं व्यवस्थापित करणाऱ्या पारंपारिक उपायांप्रमाणे या औषधोपचाराने देखील मेंदूला बरं करता येतं. पारंपारिक उपचार केवळ लक्षणे व्यवस्थापित करण्यावर आणि पुढील नुकसान रोखण्यावर लक्ष केंद्रित करता. परंतु स्ट्रोकसाठी स्टेम सेल्स थेरपी नावाचा एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहे जो आशादायक परिणाम दर्शवतो आणि पारंपारिक उपचारांपेक्षा तुमचे निरोगी जीवन जलद गतीने परत मिळवण्यास मदत करते. स्टेम सेल हे ऊतींचे पुनरुत्पादन वाढवण्यास मदत करते ज्यामुळे ते स्ट्रोक पुनर्वसनात एक आशादायक दृष्टिकोन ठरत आहे.

Cell Based Therapy Stroke
Heart Treatment Cost : हार्ट पेशंटना तीव्र झटका; हृदयाच्या आजारांवरील खर्चात वाढ, स्टेंट २ टक्क्यांनी महागले

स्ट्रोक ही एक वैद्यकीय गंभीर समस्या असून त्वरीत वैद्यकीय उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुंत कमी करता येतं. सेल बेस थेरेपीच्या सहाय्याने रुग्णाला पुर्ववत आयुष्य नव्याने जगता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com