
Pig Liver Transplant: वैद्यकीय क्षेत्रात विविध तंत्रज्ञान विकसीत होत असतं. असंच चीनच्या एका डॉक्टरांनी कमाल करून दाखवली आहे. चिनी डॉक्टरांनी पहिल्यांदाच आनुवांशिक पद्धतीने संशोधित डुक्कराचं यकृत म्हणजेच लिव्हर एका व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित केलं आहे. मुळात ब्रेन डेड व्यक्तीमध्ये हे प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या या कामगिरीमुळे भविष्यात रुग्णांवर उपचार होण्यास मदत होणार असल्याचं म्हटलं जातंय.
गेल्या काही वर्षांमध्ये याबाबत अनेक संशोधन करण्यात आलं. यावेळी डुक्कराकडे मानवाचं सर्वोत्तम अवयवदाता म्हणून पाहिलं जात आहे. अलीकडच्या काळात डुकराची किडनी आणि हृदय प्रत्यारोपण करण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आलं होतं.
चीनमधील शियान इथल्या युनिव्हर्सिटी ऑफ मिलिटरी मेडिसिनच्या डॉक्टरांनी हे यश मिळवलं असून यासंबंधी नेचर या मासिकात अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. डुक्कराच्या यकृताची परिक्षण यापूर्वी मानवी शरीरात कधीच करण्यात आलं नव्हतं. या प्रत्यारोपणानंतर संशोधकांना आशा आहे की, जीन संशोधित डुक्कर गंभीर आजारी रुग्णांना किमान काही काळापुरता आराम देऊ शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 मार्च 2024 रोजी एका लहान डुक्कराचे यकृत ब्रेनडेड प्रौढ माणसात प्रत्यारोपित करण्यात आलं. हे यकृत सुधारण्यासाठी जीनमध्ये बदल करण्यात आला. कुटुंबीयांच्या विनंतीवरून १० दिवसांनी हे परिक्षण बंद करण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी रुग्णाची माहिती गुप्त ठेवली आहे.
रुग्णाचे मूळ यकृत अस्तित्वात होतं आणि अशा प्रत्यारोपणास सहाय्यक प्रत्यारोपण म्हणतात. 10 दिवसांत डॉक्टरांनी यकृताचा रक्त प्रवाह, पित्त तयार करण्याची क्षमता, रोगप्रतिकारक प्रतिसाद त्याचप्रमाणे इतर अनेक गरजेच्या गोष्टींचा तपास करण्यात आला.
रुग्णालयातील डॉ. लिन वांग यांनी सांगितलं की, डुक्कराचं यकृत खूप चांगलं काम करत होतं आणि पित्त सुरळीतपणे तयार करण्यास सक्षम देखील होतं. त्यातून अल्ब्युमिन या प्रोटीनची निर्मितीही होत होती. भविष्यात यकृताची समस्या असलेल्या रुग्णांना मदत करणारी ही मोठी उपलब्धी असू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.