Valentine Week  Saam Tv
लाईफस्टाईल

Valentine Week History: फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा! व्हॅलेंटाईन वीक कधीपासून सुरु झाला? का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Valentine Week: व्हॅलेंटाईन वीक हा प्रेमीयुगुलांसाठी, मित्र-मैत्रिणी आणि अविवाहित असलेल्यासाठी अत्यंत खास आहे. व्हॅलेंटाईन वीकचा खरा इतिहास काय आहे?

Manasvi Choudhary

फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. प्रेमीयुगुलांसाठी ह्या महिन्यात काही खास दिवस असतात. आजकाल तरूण- तरूणी पासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्येच व्हॅलेंनटाईन आठवडा साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. पण याच व्हॅलेंटाईन वीकचा खरा इतिहास काय आहे? कधीपासून त्याची सुरूवात झाली? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

व्हॅलेंटाईन वीक हा प्रेमीयुगुलांसाठी, मित्र-मैत्रिणी आणि अविवाहित असलेल्यासाठी अत्यंत खास आहे. व्हॅलेंटाईन डे च्या एक आठवडा आधी प्रेम आणि कौतुक करण्याचा हा काळ असतो. दरवर्षी ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. यामध्ये विविध दिवस साजरे केले जातात. गुलाबांपासून चॉकलेट, टेडीदेण्यापर्यत व्हॅलेंटाईन अर्थपूर्ण प्रेमाची भावना निर्माण करतो.

व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची सुरूवात कधीपासून झाली?

व्हॅलेंटाईन वीक हा प्राचीन रोमकालीन उत्सव आहे. प्राचीन रोममधील सेंट व्हॅलेंटाईन डे खास इतिहास आहे. सेंट व्हॅलेंटाईन तिसऱ्या शतकात रोममध्ये एक पुजारी होते. सम्राट क्लॉडिया यांनी तरूणांसाठी विवाहांवर बंदी घातली होती. याचा निषेर्धार्थ व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन डे चा इतिहास काय आहे?

राजा क्लाडियसचा असा विश्वास होता की, प्रेम आणि विवाह हे पुरूषांच्या शक्तीचा नाश करतात. यामुळे त्यांनी तरूणांसाठी विवाह करण्यावर बंदी घातली होती. व याच विचारामुळे त्यांनी एक आदेश काढला होता की , अधिकारी आणि सैनिक हे लग्न करू शकत नाही. मात्र याच्याविरोधात सेंट व्हॅलेटाईन यांनी जगात आवाज उठवला त्यांनी प्रेम वाढवण्याबद्दल विचार सुरू ठेवला जेव्हा सेंट व्हॅलेटाईनला राजाचा हा आदेश कळला तेव्हा त्याने विरोध केला त्यांनी अनेक सैन्य अधिकारी आणि सैनिकांची लग्ने करून दिली जेव्हा राजाला हे कळाले तेव्हा त्याने १४ फेब्रुवारी २६९ रोजी संत व्हॅलेंटाईनला फाशी दिली त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याच्या स्मरणार्थ व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT