Irregular Menstruation saam tv
लाईफस्टाईल

Irregular Menstruation: महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितलं किती धोकादायक असू शकते परिस्थिती

महिन्यातून दोनदा मासिक पाळी येणं हे हार्मोन्सचं असंतुलन, PCOS, फायब्रॉइड्स किंवा थायरॉईडमुळे होऊ शकतं. अशी समस्या वारंवार होत असल्यास दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महिन्यातून एकदा मासिक पाळी येणं सामान्य मानलं जातं. मात्र काही महिलांना महिन्यातून दोनदा पाळी येते. यामागे अनेक कारणं असू शकतात. जर एखाद्या महिलेला महिन्यातून दोनदा वारंवार मासिक पाळी येत असेल, तर तिने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजकाल महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या पाहायला मिळतात.

मासिक पाळीचे चक्र समजून घ्या

मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचं असतं. परंतु जर ते २१ ते ३५ दिवसांच्या दरम्यान असेल तर ते सामान्य मानलं जातं. जर तुमची मासिक पाळी २१ दिवसांपेक्षा कमी किंवा ३६ दिवसांपेक्षा जास्त असेल किंवा तिच्या तारखांमध्ये दर महिन्याला बदल होत असेल तर ती अनियमित मानली जाते.

महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येण्याचं कारण

हार्मोन्सचं असंतुलन

महिन्यातून दोनदा मासिक पाळी येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे इम्बॅलन्स. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारखे हार्मोन्स आपल्या मासिक पाळीचं चक्र नियमित करण्यास मदत करतात. जेव्हा या हार्मोन्सचे संतुलन बिघडतं, तेव्हा मासिक पाळी अनियमित होते आणि महिन्यातून एकदापेक्षा जास्त वेळा येऊ शकते.

पीसीओएस

पीसीओएस ही एक सामान्य हार्मोनल समस्या आहे. यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि महिन्यातून दोनदा देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये स्त्रीच्या अंडाशयात लहान गाठी तयार होतात. ज्यामुळे तिच्या मासिक पाळीच्या तारखा बदलू शकतात.

गर्भाशयातील फायब्रॉइड्स

गर्भाशयातील फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयात तयार होणाऱ्या लहान गाठी असतात. या गाठी कुठे आणि किती मोठ्या आहेत यावरून पिरीयड्सची तारीख बदलू शकते.

थायरॉईडच्या समस्या

हायपरथायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉईडीझमसारख्या थायरॉईडच्या समस्यांमुळे तुमच्या मासिक पाळीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. या आजारांमुळे थायरॉईडद्वारे स्रवणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband- Wife Relationship Tips: नात्यात 'या' 5 गोष्टींचा हिशोब ठेवताय? पार्टनरसोबत कायमचा दुरावा येण्याआधीच थांबवा हे काम

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीत उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण; ग्रामस्थांची जोरदार तयारी

Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

OTT Releases: शुक्रवारचा प्लॅन ठरला! OTT वर पाहा ॲक्शनपासून हॉररपर्यंत ६ जबरदस्त चित्रपट

Pune : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवलं, ६ जणांची ३३ लाखांची फसवणूक; पुण्यातील बंटी बबलीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT