Phone Charging Tips google
लाईफस्टाईल

Phone Charging Tips: तुम्हीही तुमचा फोन १००% चार्ज करताय मग ही बातमी तुमच्यासाठी

Battery Health: तुमचा फोन सतत १००% चार्ज करताय? ही सवय बॅटरीसाठी घातक ठरू शकते. योग्य चार्जिंग सवयी आणि बॅटरी सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स येथे जाणून घ्या.

Saam Tv

मुंबई : फोन म्हणजे जीवनावश्यक वस्तूंपैकी एक महत्त्वाचा भाग. सध्याची तरुण मंडळी फोनमध्ये अधिक व्यग्र असते. फोन चालवण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते. हा फोन कधी बंद पडला तर अनेकांच्या जीवाचा ठोका चुकतो. एखाद्या व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी ज्या प्रमाणे अन्न पाण्याची गरज असते तसचं फोनला सुद्धा तो सतत चालू राहावा यासाठी चार्जिंग केली जाते. मात्र ही चार्जिंग किती करावी माहित आहे का? चला जाणून घेऊया.

फोनची एकूण चार्जिंग क्षमता ही १००% इतकी असते. आपण जर सतत फोन कामानिमित्त किंवा मनोरंजनाकरिता वापरला तर त्याची चार्जिंग कमी होत जाते. बाहेर जाताना आपण फोनच्या चार्जिंगची टक्केवारी लक्षात घेऊन बाहेर पडतो. परंतु फोनची चार्जिंग क्षमता जरी १०० % असली तरी ती पूर्णपणे चार्ज करणे धोकादायक ठरू शकते.

फोन १००% का चार्ज करू नये -

तुमचा फोन जर तुम्ही १००% चार्ज करत असाल तर ते धोकादायक ठरू शकते. कारण, फोनमधील बॅटरी लिथियम आयन पासून बनलेली असते. फोनची चार्जिंग जेव्हा ३०% ते ६०% असते तेव्हा लिथियम बॅटरी उत्तम काम करते. सतत १००% चार्जिंग केल्याने फोनची बॅटरी खराब होऊ शकते.

'या' वेळेस फोन चार्जिंग करणे धोकादायक ठरेल -

दिवसभर सतत फोन वापरल्यानंतर फोनची बॅटरी गरम होते. रात्री घरी आल्यावर सकाळी कामानिमित्त बाहेर पडण्यासाठी काही जण सवयीप्रमाणे रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावून झोपतात. हे धोकादायक ठरू शकते. रात्री फोन चार्जिंगला लावून झोपल्याने फोन पूर्णपणे चार्ज होऊन अधिक काळ चार्जिंगला राहिल्याने बॅटरी खराब होऊ शकते. आणि बॅटरीचा स्फोट देखील होऊ शकतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी फोनला चार्जिंग करणं योग्यतेचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT