Saam Tv
लहानपणी सगळ्यांचाच आवडता खाऊ म्हणजे चिंचेच्या गोळ्या.
चला तर मग आंबट गोड चिंचेची गोळी घरच्या घरी कशी करायची जाणून घ्या.
चिंच, गूळ, पिठीसाखर, तूप, जिरे पावडर, लाल तिखट, सैंधव मीठ
सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी गरम करा.
आता गुळ आणि चिंच सारख्या प्रमाणात घ्या. चिंच अर्धा तास भिजवून वापरा.
चिंच मिक्सरमध्ये पाण्यासकट बारिक वाटून घ्या. आणि गाळून त्याचा चोथा टाकून घ्या.
आता एका कढईत तूप वितळवून घ्या. मग त्यात गुळ टाका आणि ढवळत राहा.
साहित्याला उकळी आल्यावर चिंचेची पेस्ट ओता. मग पुन्हा त्यात तूप, जिरे पावडर, लाल तिखट, मीठ घाला आणि मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
आता मिश्रण थंड झाल्यावर त्याचे गोळे करा आणि वरून पिठी साखर लावून घ्या. तयार आहे तुमची झटपट रेसिपी.