Saam Tv
५ मे २०२५ बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल तुम्ही घरबसल्या काही सेकंदातच पाहू शकता.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स आणि ऑनलाइन स्टेप बाय स्टेप पद्धत आपण पुढे जाणून घेणार आहोत.
mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org किंवा results.digilocker.gov.in वर तुम्ही रिजल्ट पाहू शकता.
सगळ्यात आधी digilocker या वेबसाईटवर जा. तिथे क्लास सिलेक्ट करा.
आता तुमचा कॉलेज कोड, रोल नं, आणि ६ अंकांचा एक सिक्योरिटी पीन (जो तुम्हाला कॉलेज देते) तो भरा.
आता NEXT बटण दाबा. आता तुम्हाला रजिस्टर नंबरवर एक ओटीपी येईल तो भरून ''SUBMIT'' वर क्लिक करा.
आता तुमचे डिजी लॉकर अॅक्टीवेट होईल. आणि तुम्हाला dashboard वर क्लिक करायचे आहे.
पुढे तुम्हाला तुमचे बोर्ड सिलेक्ट करायचे आहे. आणि तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये तुमचा निकाल दिसेल.
तुमच्या कडे जर आधीच नोंदणीकृत असेल तर फक्त लॉग इन करा आणि तुमचा निकाल पाहा.