Manasvi Choudhary
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बदल करणे महत्वाचे आहे. यासाठी रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या
कारले, पालक आणि दुधी भोपळा हे पदार्थ डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
कारले हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अमृतासमान काम करते. कारल्यामध्ये 'कॅरेंटिन' आणि 'पॉलिपेप्टाईड-पी' नावाचे घटक असतात, जे शरीरात नैसर्गिक इन्सुलिनची क्षमता वाढवतात.
कारल्याच्या सेवनाने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात येते. यासाठी तुम्ही कारल्याची भाजी किंवा कारल्याचा रस याचे सेवन करू शकता.
पालकमध्ये 'ग्लायसेमिक इंडेक्स' खूपच कमी असतो आणि यात फायबरचे प्रमाण जास्त असते. जे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण सुधारते.
दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने भूक नियंत्रित राहते. वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेवर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.