Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

2 कप कॉर्न फ्लेक्स (मक्याचे पोहे), 2 टेबलस्पून तेल, 8-10 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), ¼ कप शेंगदाण, 2 टेबलस्पून भाजलेले दाणे, 1 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून साखर

Cornflakes Chivda | Pintrest

शेंगदाणे भाजून घ्या

कढईमध्ये थोडे तेल गरम करून शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. नंतर ते बाजूला काढून ठेवा.

Cornflakes Chivda | Pintrest

फोडणी तयार करा

त्याच कढईत उरलेले तेल घालून कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या. यामुळे चिवड्याला छान सुगंध येतो.

Cornflakes Chivda | Pintrest

मसाले मिसळा

फोडणीत हळद, मीठ आणि साखर घालून हलकेच परता. मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्या.

Cornflakes Chivda | Pintrest

कॉर्न फ्लेक्स घाला

आता कॉर्न फ्लेक्स घालून मंद आचेवर हलक्या हाताने परता. सर्व मसाले त्यावर व्यवस्थित लागतील याची खात्री करा.

Cornflakes Chivda | Pintrest

भाजलेले शेंगदाणे मिसळा

भाजून ठेवलेले शेंगदाणे आणि दाणे चिवड्यात घाला. सर्व साहित्य एकत्र मिसळून 2-3 मिनिटे परता.

Cornflakes Chivda | Pintrest

थंड करून साठवा

चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. चहा किंवा कॉफीसोबत हा कुरकुरीत मक्याचा चिवडा सर्व्ह करा.

Cornflakes Chivda | Pintrest

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रैंकी, वाचा सोपी रेसिपी

Veg Frankie Recipe | yandex
येथे क्लिक करा