Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

4 चपात्या किंवा पराठे, 2 उकडलेले बटाटे, 1 कांदा (बारीक चिरलेला), 1 सिमला मिरची (बारीक चिरलेली), 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट, 1 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून गरम मसाला, मीठ चवीनुसार, टोमॅटो सॉस, हिरवी चटणी, तेल किंवा बटर

Noodles Frankie Recipe

सारण तयार करा

कढईत थोडे तेल गरम करून आले-लसूण पेस्ट परता. त्यामध्ये कांदा आणि सिमला मिरची घालून हलके परतून घ्या.

Frankie Recipe | Saam Tv

बटाट्याचे मिश्रण बनवा

उकडलेले बटाटे मॅश करून त्यात लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला. हे मिश्रण परतलेल्या भाज्यांमध्ये मिसळून 2-3 मिनिटे शिजवा.

Frankie Recipe | google

चपाती गरम करा

तव्यावर चपाती किंवा पराठा दोन्ही बाजूंनी हलके गरम करून घ्या. हवे असल्यास थोडे बटर लावू शकता.

Frankie Recipe | Google

चटणी आणि सॉस लावा

गरम चपातीवर हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस समान प्रमाणात पसरवा. त्यामुळे फ्रँकीला छान चव येते.

Frankie Recipe | Google

सारण भरून रोल तयार करा

चपातीच्या मध्यभागी तयार केलेले बटाट्याचे सारण ठेवा. वरून कांदा घालून चपाती घट्ट रोल करा.

Frankie Recipe | Google

गरमागरम सर्व्ह करा

तयार फ्रँकी अॅल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपरमध्ये गुंडाळून सर्व्ह करा. सोबत सॉस किंवा चटणी दिल्यास चव आणखी वाढते.

Frankie Recipe | yandex

Skin Care: मॉइश्चराइज आणि ग्लोईंग त्वचा पाहिजे? मग रोज रात्री ट्राय करा हे कोरियन नाइट स्किन केयर रूटीन

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा