Skin Care: मॉइश्चराइज आणि ग्लोईंग त्वचा पाहिजे? मग रोज रात्री ट्राय करा हे कोरियन नाइट स्किन केयर रूटीन

Shruti Vilas Kadam

मेकअप पूर्णपणे काढून झोपा

दिवसभर लावलेला मेकअप, धूळ आणि प्रदूषण त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकू शकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून मेकअप पूर्णपणे काढणे आवश्यक आहे.

Skin Care | Pintrest

फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा

रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश वापरून चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर होते.

Skin Care | Pintrest

टोनरचा वापर करा

चेहरा धुतल्यानंतर टोनर लावल्याने त्वचेचा pH स्तर संतुलित राहण्यास मदत होते. तसेच त्वचा ताजीतवानी आणि फ्रेश वाटते.

Skin Care | Pintrest

मॉइश्चरायझर लावायला विसरू नका

त्वचेला रात्री पुरेसा ओलावा मिळणे गरजेचे असते. चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.

Skin Care | Saam TV

व्हिटॅमिन C किंवा नाईट सीरम वापरा

त्वचेची चमक वाढवण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी व्हिटॅमिन C सीरम किंवा त्वचेला अनुरूप नाईट सीरमचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

Face Care

पुरेसे पाणी प्या

शरीर हायड्रेट राहिल्यास त्वचेवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. झोपण्यापूर्वी योग्य प्रमाणात पाणी पिणे त्वचेसाठी लाभदायक ठरू शकते.

Face Care | Saam Tv

पुरेशी आणि शांत झोप घ्या

त्वचेच्या दुरुस्तीची प्रक्रिया रात्री झोपेतच अधिक प्रभावीपणे होते. दररोज 7 ते 8 तासांची चांगली झोप घेतल्यास त्वचा अधिक तजेलदार दिसू शकते.

Face Care | Saam Tv

Fat Loss: पोटावर चरबीचे टायर आलेत? मग उद्या सकाळपासून 1 ग्लास पाण्यात प्या हा पदार्थ

jeera and ajwain water | Saam Tv
येथे क्लिक करा