blood sugar high saam tv
लाईफस्टाईल

8AM Diabetes Symptoms: सकाळी उठल्यावर ब्लड शुगर का वाढलेली असते? 5 गोष्टी ठरतात कारणीभूत

Why is my blood sugar high in the morning: सकाळची Blood Sugar नेहमीपेक्षा जास्त येते. अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात किंवा रात्रीच्या जेवणामुळे असे झाले असावे, असे मानतात. मात्र, यामागे काही विशिष्ट शारीरिक प्रक्रिया आणि वैद्यकीय कारणे दडलेली आहेत.

Surabhi Jayashree Jagdish
  • सकाळी हार्मोन्समुळे साखर नैसर्गिकरीत्या वाढते

  • सोमोजी इफेक्टमुळे रात्री साखर कमी होते

  • इन्सुलिनचा परिणाम सकाळपर्यंत टिकत नाही

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागलेले असतात. त्यातीलच एक आजार म्हणजे डायबेटीज. अनेकदा असं होतं की, मधुमेह असलेल्या अनेक लोकांना सकाळी उठल्यावर रक्तातील साखर वाढलेली दिसते.

मात्र तुम्हाला माहितीये का, हे अचानक होत नाही. तर शरीरातल्या काही नैसर्गिक प्रक्रियेमुळे असं घडतं. यामागची कारणं कोणती आहेत आणि त्यावर काय उपाय करता येतील ते आपण जाणून घेऊया.

डॉन फेनॉमेन

सकाळच्या वेळी शरीरात काही हार्मोन्स सक्रिय होतात. जसं की कोर्टिसोल, ग्लूकागॉन, एपिनेफ्रिन आणि ग्रोथ हार्मोन. हे हार्मोन्स शरीरात रक्तातील साखर वाढवण्याचं काम करतात. यामुळे पहाटे २ ते ५ वाजेच्या दरम्यान ब्लड शुगरमध्ये वाढ होते. ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये ती अत्यधिक प्रमाणात होऊ शकते.

सोमोजी इफेक्ट (Somogyi Effect)

ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये रात्री रक्तातील साखर खूप कमी होते आणि शरीर त्याला भरून काढण्यासाठी साखरेचं प्रमाण वाढवतं. हे बहुतेक वेळा जास्त इन्सुलिन घेतल्यामुळे किंवा रात्री पुरेसं खाल्लं नसल्यानं होतं.

इन्सुलिनचा प्रभाव कमी होणं

रात्री घेतलेलं इन्सुलिन सकाळपर्यंत प्रभावी राहत नाही, आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाते. जर रात्रीच्या वेळी ब्लड शुगर वाढत असेल, तर बेसल इन्सुलिनची मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्याने पुनर्रचना करावी लागते.

रात्री उशिरा खाणं

झोपण्याच्या अगदी आधी जास्त खाणं किंवा जास्त कार्बोहायड्रेट असलेलं जेवण केल्यास रात्रीच्या वेळी ब्लड शुगर वाढू शकते. त्यामुळे रात्री हलकं आणि संतुलित जेवण करणं आवश्यक आहे.

झोपेची खराब गुणवत्ता

अपुरी किंवा तुटक झोप ही देखील इन्सुलिन रेसिस्टन्स वाढवते. ज्यामुळे सकाळी रक्तातील साखर वाढणयाचा धोका असतो. झोपेचा दर्जा खराब असल्यास हार्मोन्स असंतुलित होतात आणि शरीर साखर नियंत्रित करू शकत नाही.

काय केलं पाहिजे?

  • रात्रीच्या जेवणावर नियंत्रण ठेवा

  • झोपेची वेळ आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करा

  • रात्री पुरेसं खा, पण अतिप्रमाणात खाऊ नका

  • सकाळी ब्लड शुगर नियमित तपासा

सकाळी साखर वाढण्यामागे मुख्य कारण काय आहे?

कोर्टिसोलसारखे हार्मोन्स सकाळी साखर वाढवतात.

सोमोजी इफेक्ट म्हणजे नेमकं काय असतं?

रात्री साखर कमी होऊन शरीर ती वाढवतो.

इन्सुलिन सकाळपर्यंत प्रभावी का राहत नाही?

काही वेळा बेसल इन्सुलिन कमी पडतो.

झोपेचा दर्जा साखर नियंत्रणावर कसा परिणाम करतो?

खराब झोप इन्सुलिन रेसिस्टन्स वाढवते.

साखर नियंत्रणासाठी कोणते उपाय उपयुक्त आहेत?

संतुलित जेवण, चांगली झोप आणि नियमित तपासणी.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT