Who Should Avoid Swimming? Saam TV
लाईफस्टाईल

Who Should Avoid Swimming? : 'या' व्यक्तींच्या जीवाला पाण्यापासून धोका; स्विमिंग करण्याआधी १० वेळा विचार करा

When should you avoid swimming? : वर्कआउट करण्यासोबतच काही व्यक्ती स्विमिंग क्लास सुद्धा लावतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? काही व्यक्तींनी स्विमिंग करणे त्यांच्या आरोग्यासाठी धोक्याचे असते.

Ruchika Jadhav

सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे पाहिजे तसं लक्ष देता येत नाही. त्यामुळे वायाची ३० वर्षे ओलांडल्यावर व्यक्तींना विविध व्याधी जाणवतात. यात कोलेस्ट्रॉल वाढणे, वजन वाढणे या समस्या तर १०० पैकी ८० व्यक्तींना होतातच. वजन कमी करण्यासाठी व्यक्ती विविध पद्धतीच्या अॅक्टिवीटी करतात.

झटपट वजन कमी करण्यासाठी जीममध्ये वर्कआउट करण्यासोबतच काही व्यक्ती स्विमिंग क्लास सुद्धा लावतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? काही व्यक्तींनी स्विमिंग करणे त्यांच्या आरोग्यासाठी धोक्याचे असते.

सध्या पावसाळा सुद्धा सुरू आहे. त्यामुळे नदी किंवा धबधब्याखाली पाण्यात पोहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही आता तुम्हाला देखील पाण्यात पोहणे आवडत असेल तर आधी तुम्ही त्यासाठी फिट आहेत का नाही ते पाहा. अन्यथा पाण्यात पोहणे तुमच्या जीवावर बेतू शकतं.

हाइपोग्लाइसीमिया

काही व्यक्तींना डायबिटीजची समस्या जास्त असते. रक्तातील साखर अती प्रमाणात कमी वाढली किंवा कमी झाल्यास त्याला हाइपोग्लाइसीमिया म्हणतात. अशा स्थितीत व्यक्तीला चक्कर येते आणि जास्त वेळ माणूस बेशुद्ध राहतो. त्यामुळे हाइपोग्लाइसीमिया असलेल्या व्यक्तींनी पाण्यात पोहणे फार जोखमीचे ठरेल.

संसर्गजन्य आजार

काही व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप यासह अंगावर त्वचेवर काही रॅशेस किंवा एलर्जी असते. त्यामुळे हे आजार इतरांना सुद्धा होऊ शकतात. अशावेळी स्विमिंग करणे स्वत:हून टाळावे.

सर्जरीनंतर

जर काही कारणाने तुमच्यावर सर्जरी झाली आहे. तुमचं ऑपरेशन झालं असेल तर त्यावर टाके घातले जातात. अशा स्थितीत त्या व्यक्तीने स्विमिंग करणे चुकीचं आहे. पाण्यात भिजल्याने टाके सुकत नाहीत आणि खराब होतात. त्यामुळे तुमचं दुखणं आणखी वाढतं. अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा जाऊ शकतो.

पाण्यात पोहता येत नसल्यास

पाण्यात पोहता येत नसल्यास त्या व्यक्तीने आधी पोहायचे कसे ते शिकले पाहिजे. कोणतीही माहिती नसताना पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यास ते तुमच्या जिवावर बेतू शकतं. त्यामुळे स्विमिंग शिकल्यानंतरच पोहण्यासाठी जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT