Akola Swimming Pool Garba
Akola Swimming Pool GarbaSaam TV

Akola Swimming Pool Garba: नादच खूळा! तरुणांचा स्विमिंगपूलमध्ये जबरदस्त गरबा; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video: तरणतलावात हौशी पोहणाऱ्या युवकांनी आणि वयोवृध्द गरबा प्रेमींनी पाण्यातच गरबा गीताच्या तालावर नृत्य केलं.
Published on

Akola News:

राज्यभर सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातोय. भाविक देवीची मनोभावे आराधना करत आहेत. अनेक भक्त हे नऊ दिवस उपवास देखील करतात. अशात सोशल मीडियावर दांडिया आणि रास गरब्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akola Swimming Pool Garba
Punjab Cow Drag Old Man: वृद्ध व्यक्तीला गायीनं १०० मीटरपर्यंत नेलं फरफटत; ८३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर गरब्याच्या विविध स्टेप्ससह एक भन्नाट व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये नागरिकांनी थेट स्विमिंगपूलमध्ये गरबा खेळलाय. अकोला शहरातील वसंत देसाई क्रीडांगण येथील तरणतलावात दांडिया आणि गरबा रास खेळण्यात आलाय. तर या तरणतलावात हौशी पोहणाऱ्या युवकांनी आणि वयोवृध्द गरबा प्रेमींनी पाण्यातच गरबा गीताच्या तालावर नृत्य केलं.

पाण्यात खेळण्यात आलेल्या या वॉटर गरबाचा तरणपट्टूनी मोठा आनंद घेतला. या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या गरब्याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगलीये. सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. याआधी एका महिलेने बुलेटस्वारी करत गरबा खेळला होता. महिलेचा हा व्हिडीओही व्हायरल झालता.

गरबा खेळण्यासाठी शेवटच्या दिवशी रंगीत वेशभूषा असते. यावेळी सर्वजण विविध वेशभूषा करतात. सोशल मीडियावर नवरात्रीनिमित्त गेल्या वर्षीच्या वेशभूषेचे देखील अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. सोशल मीडियावर गरब्यातील डान्स स्टेप्सचे विविध व्हिडीओ व्हायरल झालेत. मात्र स्विमिंगपूलमधील हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे.

Akola Swimming Pool Garba
Ahmednagar Crime: धक्कादायक! रात्रीच्या अंधारात ती तरुणाशी बोलत होती; काकानं पाहताच कुऱ्हाडीचा वार, पुतणीची हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com