Punjab Cow Drag Old Man: वृद्ध व्यक्तीला गायीनं १०० मीटरपर्यंत नेलं फरफटत; ८३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, VIDEO VIRAL

Punjab cow Drag old man : मोकाट जनावरे पायी चालणाऱ्या लोकांवर हल्ला करत असल्याच्या अनेक ठिकाणी वाढत आहेत. पंजाबमध्ये गायीनं एका वृद्ध व्यक्तीला १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना घडलीय.
Cow Draged Elderly man
Cow Draged Elderly manX Social media site

Cow Draged Elderly man:

पंजाबमधील मोहालीमध्ये मोकाट गायीमुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. स्वरूप सिंग, असे या मृत वृद्धाचे नाव आहे. गायीनं ८३ वर्षीय स्वरूप सिंग यांना १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. हा व्हिडिओ 'एक्स' (आधीचे ट्विटर) या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वीणा मेहत्रा यांनी शेअर केलाय. (latest Viral News)

स्वरूप सिंग यांच्या घरात ही मोकाट गाय शिरली होती. स्वरूप सिंग त्या गायीच्या गळ्यातील दोर पकडून तिला पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही गाय बिधरली आणि पळू लागली. त्यावेळी सिंग यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. गायीच्या गळ्यातील दोर त्यांच्या हातात असल्यानं गायीने त्यांना १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं. सिंग यांना ज्या रस्त्यावरुन गायीनं फरफटत नेलं, त्या रस्त्यावरुन वाहनं धावत होती. त्यामुळे ती गायी अधिकच बिधरली.

Cow Draged Elderly man
Wedding Fight: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केली भलतीच मागणी; सासऱ्याने भर मंडपात चप्पलेने धुतला, VIDEO व्हायरल

रस्त्याने जाणाऱ्या लोकांना गाय स्वरूप सिंग यांना फरफटत नेत असल्याचं समजलं, तेव्हा त्यांनी त्या गायीला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाय अधिक वेगाने पळू लागली. यात स्वरूप सिंग यांचा मृत्यू झाला. हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मोकाट जनावरे पायी चालणाऱ्या लोकांवर हल्ला करत असल्याच्या अनेक ठिकाणी वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी चेन्नई येथे शाळेतून घरी जाणाऱ्या एका मुलीवर गायीनं हल्ला केला होता. त्यात शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली होती. हा व्हिडिओही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

Cow Draged Elderly man
College Girls Fight Video: कॉलेजच्या आवारातच मुलींची जोरदार फाईट, वातावरण टाईट; पोरं नुसती बघत राहिली...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com