Onion Hair Spray : केस गळती व कमी वयात पांढरे केस होणे यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. काहीही केल आणि कोणताही औषधोपचार केला तरी त्यावर हवा तसा फायदा होत नाही. डॉक्टरांनी दिलेल्या भल्या मोठ्या लिस्टवरुन आपण महागडे उत्पादनेही वापरतो.
खाण्यापिण्यासोबतच आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील अधिक गरजेचे आहे. यासाठी आपल्याला प्रदूषण व इतर गोष्टींपासून केसांची काळजी घ्यायला हवी. केसांना काळे करण्यासाठी अनेक जण डायचा वापर करतात. ज्याचा केसांवर दुष्परिणाम दिसू लागतो. परंतु, तुमच्या स्वयंपाकघरातील या आयुर्वेदिक स्प्रेचा वापर केल्यास तुम्हाला १५ दिवसांत रिजल्ट मिळू शकतो जाणून घेऊया त्याबद्दल
तज्ज्ञांच्या मते केसांना (Hair) नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी कांदा (Onion) हा फायदेशीर आहे. यात असणारे पोषण घटक केसांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही. आयुर्वेदातही म्हटले आहे केसांच्या वाढीसाठी व केसांना पांढरे होण्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला कांद्याचा रस लावायला हवा.
1. कसा बनवाल हेअर स्प्रे
कांदे चिरून त्याला मिक्सरमध्ये वाटू घ्या
तयार पेस्ट कापडात किंवा चाळणीत ठेवून गाळून घ्या.
तयार रस आवळ्याच्या (Amla) रसात मिसळवून केसांच्या मुळांना व टाळूला लावा.
कांद्याचा रस लावल्यानंतर डोक्याला काही मिनिटे हळूहळू मसाज करा. ज्यामुळे तो केसांच्या मुळापर्यंत पोहोचेल.
१ तासानंतर केस कोमट पाण्याने धुवा व कोरडे करुन घ्या
2. कांद्याच्या रसाने केस काळे होतात का ?
कांद्याच्या रसात क्वेर्सेटिन आणि व्हिटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडंट आढळतात. हे घटक मुक्त रॅडिकल्स तयार करण्यास मदत करतात. तसेच केसांच्या मुळांमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइडचे उत्पादनही कमी करतात. एवढेच नाही तर कांद्याच्या रसात सल्फर आढळते. त्यामुळे केसांच्या मुळांची ताकद वाढते आणि तुटण्याचे प्रमाण कमी होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.