Diwali 2024 saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2024 : दिवाळीला दिवे लावताना त्यांच्या खाली ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल सुख-समृद्धी आणि पैसा

Diwali 2024 : दिवाळीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. शास्त्रामध्ये दिवाळीच्या दिव्यांबाबत काही खास नियम सांगण्यात आले आहेत.

Surabhi Jagdish

हिंदू धर्मामध्ये दिवाळीला विशेष महत्त्व देण्यात येतं. दिवाळी हा खास दिव्यांचा सण मानला जातो. दिवाळीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. असं मानलं जातं की, या दिवशी देवी लक्ष्मी प्रत्येक घरात प्रवेश करते आणि तिच्यासोबत सुख-समृद्धी घेऊन येते.

मात्र शास्त्रामध्ये दिवाळीच्या दिव्यांबाबत काही खास नियम सांगण्यात आले आहेत. की काही खास गोष्टी दिव्यांच्या खाली ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात धन, शांती आणि सुख वाढू शकते. चला जाणून घेऊया त्या तीन गोष्टी ज्या दिव्याखाली ठेवाव्यात.

तांदूळ

हिंदू धर्मात तांदूळ हे शुभ प्रतीक मानलं जातं. दिवाळीत दिव्याखाली तांदूळ ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे. तांदूळ देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि यामुळे घरात समृद्धी आणि शांती येते.

हळद

हळद केवळ आरोग्यासाठीच नाही तर धार्मिक विधींमध्येही महत्त्वाची मानली जाते. हळदीमध्ये लक्ष्मी देवी वास करते आणि ती शुभ प्रतीक मानलं जातं. हळद दिव्यांच्या खाली ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि नकारात्मकता दूर होते असं मानलं जातं

धातूचं नाणं

धातूचं नाणं दिव्याखाली ठेवणं खूप शुभं मानण्यात येतं. असं केल्याने तुमच्या घरात धनसंपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर आशीर्वाद देते. नाणं देवी लक्ष्मीला आकर्षित करतं आणि ते ठेवल्याने आर्थिक समस्यांपासून आराम मिळतो असं म्हणतात.

या गोष्टी दिवाळीच्या दिवशी घरात दिव्यांच्या खाली ठेवण्याचा उद्देश घरात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी वाढवणं आहे. या उपायांमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : वडील घराला कडी लावून निघाले अन्‌ घात झाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू

Nandurbar Politics: महायुतीला धक्का, नंदुरबारमध्ये हिना गावित यांची बंडखोरी, शिवसेनेच्या उमेदवाराला देणार टक्कर

VIDEO : 'माझ्या पाठिंब्यासाठी काही लोक पैसे मागताय', मनोज जरांगेंचा आरोप

Maharashtra News Live Updates: निवडणूक खर्चाचे दर जाहीर

Motichoor Ladoo Recipe: दिवाळीत लक्ष्मी पूजनाला बनवा घरच्या घरी तोंडात विरघळणारे मोतीचूर लाडू, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT