Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला कोणत्या दिशेला लावावा यम दिपक? जाणून घ्या दिव्यासंदर्भातील खास नियम

Narak Chaturdashi 2024 Deep Daan: हिंदू पंचांगानुसार, नरक चतुर्दशी बुधवारी 30 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. यावेळी नरक चतुर्दशीच्या दिवशी किती दिवे लावावेत आणि या दिवशी यमदीपाचे धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
Narak Chaturdashi 2024 Deep Daan
Narak Chaturdashi 2024 Deep Daansaam tv
Published On

दिवाळीला सुरुवात झाली असून धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकांनी विविध गोष्टींची खरेदी केली. दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी दिव्याचं विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, नरक चतुर्दशी बुधवारी 30 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे.

नरक चतुर्दशीला रूप चौदस, यम चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी असंही म्हटलं जातात. परंपरेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान यमाची पूजा करण्यात येते. यासोबत त्यांच्यासाठी दिवे देखील लावले जातात. नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लावेले जातात. यावेळी नरक चतुर्दशीच्या दिवशी किती दिवे लावावेत आणि या दिवशी यमदीपाचे धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

Narak Chaturdashi 2024 Deep Daan
Diwali 2024: दिवाळीला गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी? घरात येईल सुख-समृद्धी

नरक चतुर्दशीच्या दिवशी किती दिवे लावावे?

नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी 14 दिवे लावण्याची परंपरा आहे. दरम्यान या चौदा दिव्यांपैकी एक दिवा यमदेवतेसाठी असतो.

नरक चतुर्दशीला कुठे दिवे लावायचे?

नरक चतुर्दशीच्या दिवशी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, घराच्या पूर्व दिशेला, घराच्या स्वयंपाकघरात, गच्चीवर दिवा लावणं शुभ मानण्यात येतं. त्याचप्रमाणे यावेळी घर आणि तुळशीच्या रोपाजवळ देखील दिवे लावावेत.

तेल किंवा तुपाचे दिवे लावा

नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवे लावण्यासाठी तूप किंवा मोहरीचे तेल वापरणं चांगलं मानलं जातं. घराच्या मंदिरात लावलेल्या दिव्यात तूप आणि घराबाहेर लावलेल्या दिव्यात तेल वापरावे.

नरक चतुर्दशीला यम दिवा लावण्याचा नियम काय?

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमाच्या नावाने दिवा लावल्याने अकाली मृत्यूचा धोका टळतो, असं मानलं जातं. या दिवशी यमाच्या नावाने दीप प्रज्वलित करून यमाच्या यातनांपासून मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात येते.

Narak Chaturdashi 2024 Deep Daan
Narak Chaturdashi 2024: यंदाच्या वर्षी नरक चतुर्दशी केव्हा आहे? या दिवशी करा 'हे' काम, पाहा मुहूर्त!

नरक चतुर्दशीच्या दिवशी यम दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला ठेवणं योग्य आहे. यमासाठी लावलेल्या दिव्याची वात दक्षिणेकडे ठेवणं शुभ मानलं जातं. या दिशेला भगवान यम वास करतात असं मानण्यात येतं. तसंच यमाच्या नावाचा दिवा चौमुखी असला पाहिजे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com