Republic day yandex
लाईफस्टाईल

First Republic Day: भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन कुठे साजरा झाला? जाणून घ्या

First Republic Day Celebration of India: देशभरात प्रजासत्ताक दिन 2025 ची तयारी जोरात सुरू आहे. दरवर्षी 26 जानेवारीला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. या दिवशी स्वतंत्र भारताला राज्यघटना मिळाली आणि या देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींनी शपथ घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकशाहीची ७५ वर्षे पूर्ण करुन या वर्षी आपला देश 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हा खास दिवस दरवर्षी २६ जानेवारीला मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारताच्या इतिहासात २६ जानेवारीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्वतंत्र भारतात लोकशाहीची स्थापना झाली. दरवर्षी या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो.

हा दिवस देशभर साजरा केला जात असला तरी राजधानी दिल्लीत यानिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी, कर्तव्य पथ वर एक परेड आयोजित केली जाते आणि विविध राज्यांची रथयात्रा देखील काढली जाते. हा कार्यक्रम पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची पद्धत बदलली आहे. पण पहिला २६ जानेवारी कसा आणि कुठे साजरा झाला हे तुम्हाला माहिती आहे का?

देशाची राज्यघटना केव्हा लागू झाली?

अनेक वर्षे गुलामीच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या भारताला अनेक संघर्षानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर हा देश चालवण्यासाठी लोकशाहीची गरज होती आणि त्यासाठी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी झाली. यामुळे दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

पहिला प्रजासत्ताक दिन कुठे साजरा करण्यात आला?

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा पुराण किलासमोरील इर्विन स्टेडियमवर पार पडला. सध्या ते मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम म्हणून ओळखले जाते. त्या वेळी दिल्लीचे प्राणीसंग्रहालय देखील येथे होते.

पहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला गेला?

२६ जानेवारी १९५० चा दिवस अनेक अर्थाने भारतासाठी खास होता. या दिवशी केवळ देशाची राज्यघटनाच लागू झाली नाही तर देशाला पहिला राष्ट्रपतीही मिळाला. भारताची राज्यघटना लागू झाल्यानंतर भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली. सध्याच्या संसद भवनाच्या दरबार हॉलमध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर इर्विन स्टेडियमवर २१ तोफांची सलामी देऊन तिरंगा फडकवला. यासोबतच त्यांनी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले. या दिवसापासून, दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आणि यादिवशी देशभरात राष्ट्रीय सुट्टी देखील असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT