Mental Health: मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Foods for Mental Health: आपण जे खातो त्याचा प्रभाव आपल्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर होतो. त्यामुळे आपण रोजच्या आहारात काय खातो हे महत्वाचे आहे. ताजी फळे आणि भाज्या खाल्ल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते.
Mental health
Mental healthyandex
Published On

आपण जे खातो त्याचा प्रभाव आपल्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर होतो. त्यामुळे आपण रोजच्या आहारात काय खातो हे महत्वाचे आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आपले आरोग्य ठरवत असते. ताजी फळे आणि भाज्या खाल्ल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.

आजकल लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि झोपण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. अशा परिस्थितीत केवळ शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. यामुळेच आजकाल अनेक लोक तणाव आणि डिप्रेशन सारख्या समस्यांना बळी पडत आहेत. ही एक गंभीर मानसिक समस्या आहे, ज्यावर वेळीच नियंत्रण न केल्यास प्राणघातक ठरू शकते. तुमच्या व्यस्त रुटीनमध्ये मानसिक आरोग्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे.

पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहारात यांचा समावेश केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात. फोलेट, मॅग्नेशियम आणि इतर जीवनसत्त्वे असलेल्या भाज्या तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारू शकतात आणि डिप्रेशनची लक्षणे कमी करू शकतात.

नट आणि बिया

जर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी डिप्रेशनने त्रस्त असेल तर आहारात नट आणि बियांचा नक्कीच समावेश करा. ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, हे नट आणि बिया मूड सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यात मदत करू शकतात.

Mental health
Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळ्यासाठी जात असाल; तर 'या' गोष्टींची घ्या काळजी, तुमची यात्रा होईल टेंशन फ्री

डार्क चॉकलेट

जर तुम्हाला चॉकलेट खायला आवडतं. तर ही चांगली सवय आहे. डार्क चॉकलेट खाल्ल्याने डिप्रेशनची लक्षणे कमी होण्यास मदत होते. अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या घटकांनी समृद्ध असल्याने, ते मेंदूचा रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतात. आणि त्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते.

बेरी

अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वाने समृद्ध बेरी देखील डिप्रेशनमध्ये खूप प्रभावी आहेत. त्याचा आहारात समावेश केल्याने डिप्रेशनशी संबधित ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

आंबवलेले पदार्थ

डिप्रेशनपासून मुक्तता मिळवण्यासाठी आंबवलेल्या पदार्थांचा तुमच्या आहाराचा समावेश करु शकता. या पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांच्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. निरोगी आतडे मायक्रोबायोम मूड सुधारण्यासाठी आणि डिप्रशनची लक्षणे कमी करण्यासाठी मदत करतात.

Mental health
Health: हिवाळ्यात 'हे' सुपरफूड खा, व्हाल सुपरमॅन! शरीरात तुफान एनर्जी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com