
हिवाळा ऋतु जवळ आला की शरीराच्या गरजा बदलतात. थंडीच्या ऋतुत आपण उबदार कपडे आणि सूपसारख्या गरम पदार्थांना जास्त महत्त्व देताे. यावेळी यकृताच्या आरोग्याची काळजी घेणेही खूप महत्त्वाचे असते. यकृत हा शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे, जो विषारी पदार्थ काढून टाकतो. रक्त शुद्ध करतो आणि निरोगी ठेवतो. उन्हाळ्यात यकृत डिटॉक्स करण्याचे बरेच मार्ग आहेत. परंतु हिवाळ्यात लिव्हर (liver) डिटॅाक्स करण्यासाठी कोणते उपाय कराल. जाणून घ्या.
गरम किंवा कोमट पाणी
हिवाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे फार महत्वाचे आहे. कारण लोक थंडीच्या वातावरणात कमी पाणी पितात. म्हणून, गरम किंवा कोमट पाणी प्यायले पाहिजे. जे यकृत स्वच्छ करण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करेल. तुम्ही सकाळी एक ग्लास गरम पाणी पिऊ शकता आणि दिवसभर कोमट पाणी पिऊ शकता. गरम पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि यकृत डिटॉक्स करण्यासही मदत होते.
शारीरिक हालचाली
या ऋतूत निरोगी राहण्यासाठी यकृताच्या डिटॉक्सिफिकेशनसोबतच शारीरिक हालचालीही खूप महत्त्वाच्या असतात. व्यायाम आणि योगा केल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि यकृताला विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. हिवाळ्यात तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग किंवा इतर शारीरिक अॅक्टिव्हिटीचा समावेश करू शकता.
हळद, आले आणि लिंबू
हिवाळ्यात हळद, आले आणि लिंबू यांसारखे नैसर्गिक घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतात. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म तसेच कर्क्यूमिन नावाचे तत्व असते, जे यकृताच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते. आलं पचन प्रक्रिया सुधारते जे यकृतासाठी फायदेशीर आहे. याशिवाय लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
फळे
हिवाळ्यात ताजी लिंबूवर्गीय फळे, जसे की संत्री, लिंबू, आणि द्राक्षे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये नैसर्गिक ऍसिड असतात, जे यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. तुम्ही या फळांचे सेवन करू शकता किंवा त्यांचा रस बनवून ते पिऊ शकता. तुमच्या यकृतासोबतच ते तुमची त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.
भाज्या
हिरव्या पालेभाज्या, जसे की पालक, मुळ्याची पाने आणि गाजर हिवाळ्यात यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात. या भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि असतात. ज्यामुळे यकृत योग्यरित्या कार्यरत राहते. याशिवाय बीटरूट, भोपळा आणि ब्रोकोली यांसारख्या भाज्या यकृत साफ करण्यास मदत करतात. या फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारे पोषक तत्व यकृताचे कार्यक्षमता वाढवतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.