Mahalaya Amavasya saam tv
लाईफस्टाईल

Mahalaya Amavasya 2025: कधी आहे महालया अमावस्या? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

हिंदू धर्मात प्रत्येक तिथी आणि सणाला विशेष महत्त्व असते. त्यापैकीच एक म्हणजे महालय अमावस्या (Mahalaya Amavasya). हा दिवस पितृ पक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो, तसेच याच दिवसापासून देवी दुर्गा पृथ्वीवर येते, अशीही मान्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महालया अमावस्या ही पितृपक्षाची सांगता आणि दुर्गापूजेच्या आरंभीचा दिवस मानला जातो. सनातन परंपरेनुसार, या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचं विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या तिथीला माता दुर्गा कैलास पर्वतावरून आपल्या कुटुंबासह पृथ्वीवर आगमन करतात, अशी मान्यता आहे. यंदाच्या वर्षी महालया अमावस्या २१ सप्टेंबर २०२५ रोजी आहे.

महालया अमावस्या २०२५ मुहूर्त

  • अमावस्या तिथी प्रारंभ : २१ सप्टेंबर २०२५, पहाटे १२.१६

  • अमावस्या तिथी समाप्त : २२ सप्टेंबर २०२५, पहाटे १.२३

  • कुतुप मुहूर्त : सकाळी ११.५० ते दुपारी १२.३८

  • रौहिण मुहूर्त : दुपारी १२.३८ ते १.२७

  • अपराह्न काल : दुपारी १.२७ ते ३.५३

महालया अमावस्येला काय कराल?

या दिवशी पितरांची पूजा करून त्यांना अन्न आणि जल अर्पण करावं. त्याचप्रमाणे गरजू आणि गरीब लोकांना भोजन द्यावं. रात्री दीपदान करण्याचीही प्रथा आहे. असं मानण्यात येतं की, दीपदानामुळे पितरांना आपल्या लोकांमध्ये परत जाण्यास सुलभता मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने संततीवर नेहमी कृपा राहते.

महालया आणि मातृ आगमन

धार्मिक विश्वासानुसार, महालया अमावस्येच्या दिवशी माता दुर्गा आपल्या कुटुंबासह कैलासावरून पृथ्वीवर प्रस्थान करतात. हाच दिवस ‘महालया’ म्हणून ओळखला जातो. याच दिवशी पितरांचे तर्पण केलं जातं.

दुसऱ्या दिवशीपासून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होत असल्याने या काळात देवीच्या मूर्तींना अंतिम स्वरूप देण्यात येतं आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये रंग भरण्याची महत्त्वाची परंपरा पूर्ण केली जाते.

काय आहे महालया अमावस्येची कथा?

महालया अमावस्येची कथा महाभारताशी जोडण्यात येते. असं सांगितलं जातं की, वीर योद्धा कर्णाच्या मृत्यूनंतर तो स्वर्गात पोहोचला होता. परंतु त्याठिकाणी त्याला अन्नाऐवजी सोनं आणि रत्नच मिळालं. त्याने आश्चर्याने कारण विचारलं असता त्याला कळलं की, आयुष्यात त्याने भरपूर दान-पुण्य केलं, पण आपल्या पितरांना कधीही अन्न किंवा जल अर्पण केलं नव्हतं.

ही गोष्ट कळल्यानंतर कर्णाने मृत्यूदेव यमराजांकडे विनंती केली की, त्याला काही दिवस पृथ्वीवर परत जाण्याची संधी द्यावी. जेणेकरून तो आपल्या पितरांसाठी तर्पण व श्राद्धकर्म करू शकेल. कर्णाची निष्ठा पाहून यमराजांनी त्याला १५ दिवसांचा अवधी दिला. त्या काळात त्याने आपल्या पितरांचं तर्पण केलं. पुढे हा कालखंड ‘पितृपक्ष’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

या पंधरा दिवसांत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण अन्न, जल आणि प्रार्थना अर्पण करतो. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी आणि शांती नांदते, अशी श्रद्धा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत आणखी एका उमेदवारावर हल्ला; डोकं फुटलं, राजकीय वर्तुळात खळबळ

Badlapur Blast: बदलापूर पुन्हा हादरलं! केमिकल कंपनीत लागोपाठ ८-१० स्फोट, २-३ किलोमीटरपर्यंत आगीच्या ज्वाळा

Manmad- Indore Railway: उत्तर महाराष्ट्राचा विकासाला MP मध्ये ब्रेक; मनमाड-इंदौर रेल्वेमार्गाचं जमीन अधिग्रहण अद्याप अपूर्ण

Virat Kohli: एअरपोर्टवर चाहत्यांच्या गर्दीत फसला विराट कोहली; कसाबसा गाडीपर्यंत पोहोचला, Video सोशल मीडियावर व्हायरल

BMC Election : मुंबईसाठी अजितदादांचा वादा! चाळ आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणीपुरवठा; जाहीरनाम्यात राष्ट्रवादीचे १० आश्वासनं

SCROLL FOR NEXT