Shukrawar che Upay: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शुक्रवारी करा 'हे' उपाय; लक्ष्मी देवी मिळवून देईल पैसा

Friday remedy for financial improvement : हिंदू धर्मात आणि विशेषतः ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. देवी लक्ष्मी ही धन, समृद्धी, ऐश्वर्य आणि सौभाग्याची देवता मानली जाते.
Friday Remedies To Get money
Friday Remedies To Get moneysaam tv
Published On

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस एका खास देवाला समर्पित केलेला असतो. यानुसार, प्रत्येक दिवसाचं आणि तिथीचं महत्त्व वेगळं असतो. आज शुक्रवारचा दिवस आहे आणि धन, वैभव आणि समृद्धीची देवी मानल्या जाणाऱ्या देवी लक्ष्मीला शुक्रवारचा दिवस समर्पित आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार असं मानलं जातं की, आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी. त्याचप्रमाणे असे काही उपाय आहेत ज्यांचा अवलंब केल्यास तुमची पैशांची कमतरता एका झटक्यात दूर होऊ शकते. मात्र हे उपाय रात्रीच्या वेळेस करणं फायद्याचं असतं.

या मंत्राचा जप करा

शुक्रवारी सकाळी स्नान करून लक्ष्मीमातेची पूजा केली पाहिजे. यानंतर सायंकाळच्या वेळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. यावेळी एका चौकीवर लाल कापड पसरवा. आता त्यावर आई लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. त्यानंतर त्यांना रोली, फुले, अक्षत आणि श्रृंगार वस्तू अर्पण करा. देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा आणि "ॐ श्रीं ऋं क्लेन श्री सिद्ध लक्ष्म्यै नमो नम:" या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

कवड्यांचे उपाय

रात्री पाच कवडी घेऊन त्या लाल कापडात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे गोळे आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. असं मानलं जातं की, या उपायाने आपल्या घरातील गरिबी दूर होणार आहे.

Friday Remedies To Get money
Somvar Upay: घरी येईल अचानक भरपूर पैसा; सोमवारच्या दिवशी शंकरासाठी करा हे खास उपाय

तांदळाने करा हा उपाय

शुक्रवारी रात्री मूठभर तांदूळ घेऊन लाल कापडात बांधून घराच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवा. असं केल्याने घरात आशीर्वाद मिळेल. त्याचप्रमाणे तुमच्या घरातील आर्थित परिस्थिती देखील सुधारणार आहे.

Friday Remedies To Get money
Budh-Guru Yuti: 12 वर्षांनी बनणार बुध-गुरुची महायुती; 3 राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

श्री यंत्राची पूजा

शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा सर्वात शक्तिशाली मानली जातं. अशावेळी शुक्रवारी श्रीयंत्राची स्थापना करून त्याची विधिवत पूजा केली पाहिजे. श्रीयंत्राच्या नित्य उपासनेमुळे आर्थिक प्रगती होते, असं मानलं जातं.

Friday Remedies To Get money
Guruvar che Upay : आजच्या दिवशी करा फक्त हे छोटं काम; घरात येईल लक्ष्मी, वास्तू दोषही होईल दूर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com