व्हॉट्सअॅप वेबमध्ये स्क्रोलिंग बंद झाल्याने वापरकर्त्यांची गैरसोय.
सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस, वापरकर्त्यांची नाराजी व्यक्त.
नवीन एआय फीचर अपडेटनंतर बिघाड.
व्हॉट्सअॅपकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण नाही.
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे वेबचं स्क्रोलिंग गंडलं असल्याचे बातमी समोर आली आहे. युजर्सने सोशल मीडियावर यासंदर्भांत तक्रारी दाखल केल्या आहेत. नुकतेच व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर सुरु केले आहे. मात्र या अडथळ्यानंतर वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज सकाळपासून व्हॉट्सअॅप वेबवर स्क्रोलिंगसाठी अडथळे निर्माण होत आहेत. ऑफिस मधील कर्मचाऱ्यांचे यामुळे काम रखडत आहेत. या संदर्भात सोशल मिडीयावर तक्रारींची रांग लागली आहे. एका तक्रारकर्त्याने म्हटले आहे, " आज व्हॉट्सअॅप वेब मध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आमच्या ऑफिस मधील बरीच काम धीम्या गतीने सुरु आहेत. तर दुसऱ्याने म्हटले आहे, "माझ्या व्हॉट्सअॅप वेब मध्ये स्क्रोलिंग करताना अडचणी येत आहेत"
सध्या व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी नवे फीचर सुरु केले आहे. यामुळे कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होत आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटनुसार कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी एआय पॉवर्ड फीचर दिलं आहे. यामध्ये व्हिडिओ कॉलिंगदरम्यान विविध फिल्टरसह बॅकग्राउंड बदलत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांचे मित्र परिवारासोबतचे व्हिडिओ कॉलिंगवरचे संवाद आणखी मजेशीर होत आहे.
या समस्येबद्दल व्हॉट्सअॅपकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. तसेच आज सकाळ पासून या अडचणीमुळे व्हॉट्सअॅप वेबवर काम करणाऱ्या वापरकर्त्यांचे हाल होताना पाहायला मिळतायत. शिवाय या अडचणी सकाळच्या वेळेस उदभवल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. दरम्यान स्क्रोलिंग का बंद पडलं या प्रश्नाचं उत्तर वापरकर्ते शोधत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.