WhatsApp Secret Code Saam Tv
लाईफस्टाईल

Chat Lock पेक्षाही तगडं फीचर लॉन्च! WhatsApp Secret Code वापरून इतरांपासून लपवा तुमचे चॅट्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Whatsapp Secret Code Feature:

जगात लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप नेहमीच युजर्ससाठी नवीन फिचर लाँच करत असतात. युजर्संना व्हॉट्सअॅप वापरणे सोपे जावे यासाठी हे नवीन फिचर लाँच केले जातात. व्हॉट्सअॅपने आता एक नवीन 'सीक्रेट कोड' फिचर लाँच केले आहे.

युजर्सच्या गोपनियतेसाठी हे नवीन फिचर लाँच करण्यात आले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स आपले प्रायव्हेट चॅट्स सिक्युर करु शकतात. हे फिचर अॅपच्या चॅट लॉक टुलवर काम करेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फिचर्स

व्हॉट्सअॅपच्या या नवीन फिचरचा वापर करुन युजर्स आपले पासवर्डसह चॅट सुरक्षित करु शकतात. सीक्रेट कोड फिचरच्या वापर करुन तुम्ही तुमचे चॅट्स गुप्त ठेवू शकता. हे फिचर फोनच्या लॉक कोडपेक्षा वेगळे असेल. यामुळे जर तुम्ही तुमचा फोन दुसऱ्या कोणाला दिला तरी तुमचे चॅट्स सुरक्षित राहतील. याशिवाय चॅट लॉक केलेले फोल्डर मुख्या चॅटपासून वेगळे राहतील. ते फोल्डर फक्त तुम्हालाच माहित असेल. हे चॅट्स पाहण्यासाठी युजर्सला सर्च बारमध्ये सीक्रेट कोड लिहावा लागेल.

व्हॉट्सअॅपचे हे नवीन फिचर युजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. हे फिचर लाँच करताना मेटा चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपवर नवीन सीक्रेट कोड फिचर लाँच केले जात आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या चॅटला युनिक पासवर्डने सुरक्षित करु शकतात. जेव्हा तुम्ही सर्च बारमध्ये तुमचा कोड टाइप कराल तेव्हाच लॉक केलेले चॅट्स पाहू शकता. हे नवीन फिचर वापरल्याने कोणीही तुमचे चॅट्स पाहू शकणार नाहीत.

व्हॉट्सअॅपचे हे नवीन फिचर या आठवड्यापासून सुरू होणार आहे. हे फिचर येत्या महिन्यापासून युजर्ससाठी उपलब्ध होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT