WhatsApp Animated Features
WhatsApp Animated Features Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Animated Features : व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅनिमेटेड अवतार पाठवता येणार, जबराट फीचर आलाय...

कोमल दामुद्रे

WhatsApp Animated Avatar Pack : व्हॉट्सअॅपने आपल्या वापकर्त्यांसाठी पुन्हा एकदा नवीन फीचर्स आणले आहे. यापूर्वी आपण अॅपवरुन मेसेज, व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअॅप कॉल यांसारख्या गोष्टींचा फायदा घेता येतो.

पण सध्या व्हॉट्सअॅपने नवीन फीचर्स लॉन्च केले आहे. या लेटस्ट फीचर्सचे नाव अॅनिमेटेड अवतार असे आहे. याचा वापर युजर्स चॅटिंग दरम्यान अॅनिमेटेड अवतार पाठवू शकतील. या नवीन अपडेची माहिती व्हॉट्सअॅपच्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या Webetainfo ने शेअर केली आहे.

हे नवीन फीचर्स (Feature) अॅनिमेटेड अवतार पॅकमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असेल. सध्या हे फीचर WhatsApp बीटा Android 2.23.16.12 या युजर्सना वापरता येणार आहे. हे लेटस्ट फीचर वापरण्यासाठी बीटा युजर्सला Google play Store वरुन लेटस्ट बीटा वर्जन अपडेट करावे लागेल.

1. Wabetainfo ने शेअर केले

Wabetainfo ने एक अॅनिमेटेड इमेज शेअर केली आहे, जी अवतार आवृत्ती दर्शवते. कोणाशीही चॅट करत असताना, वापरकर्ते त्यांचा अॅनिमेटेड अवतार सहज पाठवू शकतील. Wabetainfo यापूर्वी देखील फीचरबद्दल सांगितले होते. सध्या या फीचरवर काम केले जात असून ते अनेक डायनॅमिक अवतारात दिसत आहे.

2. अॅनिमेटेड अवतार फीचर टॅबमध्येही उपलब्ध असेल

व्हॉट्सअॅपमध्ये हे फीचर वापरण्यासाठी यूजर्सला चॅटिंगमध्ये (Chat) जाऊन अवतार टॅबवर क्लिक करावे लागेल. जर अवतारासाठी काही अॅनिमेशन्स असतील तर याचा अर्थ युजर्सला या अॅनिमेशन अवतारची सुविधा मिळाली आहे असे होईल.

3. नॉन बीटा वापरकर्ते देखील वापरु शकतात

जर तुमच्याकडे व्हॉट्सअॅपचे बीटा व्हर्जन नसेल तर अॅनिमेशन अवतार प्राप्त करण्यासाठी देखील युजर्स सक्षम असतील. यासाठी नॉन बीटा आवृत्ती वापरकर्ते देखील हे अॅनिमेटेड अवतार प्राप्त करण्यास सक्षम असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

SCROLL FOR NEXT