AI New Features: Youtuberची मज्जा! AI करणार भारी कंटेट शोधण्यात मदत, गुगलचे नवीन फीचर

Google New Update : टेक कंपनी गुगल आपल्या विविध प्लॅटफॉर्म व सेवांमध्ये AI चा समावेश करणार आहे.
AI New Features
AI New FeaturesSaam tv
Published On

AI Generate Youtube Content : सध्या AI ची सगळीकडे चर्चा सुरु आहे. नुकत्याच AI च्या विशेष बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा केली असून लवकरच यामध्ये नवीन अपडेट येणार आहे. टेक कंपनी गुगल आपल्या विविध प्लॅटफॉर्म व सेवांमध्ये AI चा समावेश करणार आहे.

जर तुम्ही देखील युट्यूबर असाला तर तुम्हाला Subscriber वाढवण्यासाठी कटेंट शोधण्यासाठी AI आता मदत करणार आहे. यासाठी यूट्यूबर युजर्ससाठी एक नवीन AI टूल आणले जात आहे.

AI New Features
New Railway Ticket Rule : रेल्वेचा नवा नियम! तिकीट असले तरी भरावा लागू शकतो दंड, प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

YouTube ने आपल्या वापरकर्त्यांसाठी जाहीर केले आहे की कंपनी AI ऑटोजनरेट केलेल्या सारांश वैशिष्ट्याची चाचणी करत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना (users) त्यांच्या आवडीचा कंटेंट शोधण्यात पूर्वीपेक्षा अधिक सुविधा मिळणार आहे.

1. YouTube चे AI टूल कसे काम करेल?

YouTube च्या AI ऑटोजनरेटेडच्या मदतीने, प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक व्हिडिओसह एक स्वतंत्र असा सारांश पाहता येईल. व्हिडिओशी संबंधित माहिती या सारांशात पाहिली जाऊ शकते. यूट्यूबवर सर्च करून व्हिडिओ पाहणाऱ्या युजर्ससाठी हे फीचर (Feature) उपयुक्त ठरणार आहे.

AI New Features
Shweta Tiwari : तुझ्या वयालाही सौंदर्य लाजवेल!

या फीचरच्या मदतीने युजरला कोणत्याही व्हिडिओचा पटकन आढावा घेता येणार आहे. या फीचरमुळे युजर्सना व्हिडिओ नेमका कशाचा आहे आणि त्या व्हिडिओ पाहायचा आहे की नाही हे ठरवता येईल.

2. व्हिडिओचे वर्णन कसे असेल?

यूट्यूबवर व्हिडिओसह वर्णनाची सुविधा देखील उपलब्ध आहे. YouTube व्हिडिओंवरील वर्णन चॅनेल आणि व्हिडिओ निर्मात्याने स्वतः लिहिले आहे. वर्णन वाचल्यानंतरही, YouTube वर व्हिडिओ पाहणारे युजर्स ठरवतील तो व्हिडिओ त्याच्या आवडीचा आहे की नाही.

AI New Features
Kantola Vegetable Benefits: अनेक आजारांवर बहुगुणी करटोला भाजी, फायदे वाचाल तर रोजच खाल

अशा वेळी, यूट्यूबरच्या नवीन एआय ऑटोजनरेटर सारांश वैशिष्ट्यासह वर्णन वैशिष्ट्य हटविले जाणार नाही असे सांगितले जात आहे. जर तुम्ही YouTube चे नवीन फीचर वॉच आणि सर्च पेजवर पाहू शकाल. सुरुवातीच्या टप्प्यात यूट्यूबचे नवीन फीचर टेस्टिंग बेसवर फक्त काही युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com