WhatsApp HD Photo Update Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp HD Photo Update: Photo-Video सेंड करताना होणार नाही Blur, HD Quality मध्ये पाठवता येणार, कसे जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

कोमल दामुद्रे

WhatsApp New Update : WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट आणत असते. सर्वाधिक वापरलं जाणारं व इन्स्टन्ट मेसेजिंग अॅप WhatsApp. चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग सर्वांसाठी व्हॉट्सअॅप हे बेस्ट ऑप्शन आहे.

बरेचदा फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना ते ब्लर होतात किंवा त्याची क्वालिटी फाटते. त्यामुळे आपण फोटो पाठवण्यासाठी काही पर्यायी अॅप्सची मदत घेतो. परंतु, आता तुमची ही समस्या देखील लवकरच संपणार आहे.

व्हॉट्सअॅप (WhatsApp) अँड्रॉइड आणि आयफोनवर एचडी फोटो पाठवण्याच्या फीचरची चाचणी करत आहे. कंपनीने जूनमध्ये iOS साठी WhatsApp आणि Android साठी WhatsApp साठी फीचरची (Feature) बीटा चाचणी सुरू केली आणि आता ते सर्वसामान्यांसाठी आणत आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनेलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की व्हॉट्सअॅपवर फोटो शेअरिंगला नुकतेच अपग्रेड मिळाले आहे आणि आता तुम्ही एचडीमध्ये पाठवू शकता.

1. जागतिक स्तरावर लाँच केले जाईल

येत्या काही आठवड्यांमध्ये एचडी फोटो जागतिक स्तरावर उपलब्ध होत आहेत आणि व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, एचडी व्हिडिओ पर्याय लवकरच येत आहे. याचा वापर तुम्ही मित्र किंवा कुटुंबासोबत करू शकता. तसेच हाय रिझोल्यूशनमध्ये फोटो शेअर करण्याचा पर्याय मिळत आहे. WhatsApp च्या एंड-टू-एंडपासून याचा वापर करता येईल असे WhatsApp ने एका निवेदनात म्हटले आहे. एंड एन्क्रिप्शनद्वारे फोटो सुरक्षित (Safety) देखील राहातील.

2. WhatsApp वर HD फोटो कसे पाठवायचे?

1. हाय रिझोल्यूशनमध्ये फोटो पाठविण्यासाठी, वापरकर्ते या टिप्स फॉलो करु शकतात. ज्यामुळे फोटो पाठवण्यास अधिक मदत होईल.

2. एचडी फोटो पाठवण्यासाठी पहिल्यांदा WhatsApp उघडा आणि चॅटमध्ये प्रवेश करा.

3. आता फोनमध्ये साठवलेले फोटो ऍक्सेस करण्यासाठी कॅमेरा आयकॉन किंवा फाइल आयकॉनवर टॅप करा. आवश्यक असल्यास मेसेज जोडा आणि पाठवा.

4. तुम्हाला फोटो 'स्टँडर्ड क्वालिटी (1,365x2,048 पिक्सेल)' किंवा 'एचडी क्वालिटी' (2,000x3,000 पिक्सेल) मध्ये पाठवायचा आहे का यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एक पॉप-अप दिसेल.

5. यापैकी एक पर्याय निवडा आणि फोटो रिसीव्हरला पाठवला जाईल.

6. HD फोटो खालच्या डाव्या कोपर्यात 'HD' म्हणून चिन्हांकित केले जातील.

7. कंपनीने म्हटले आहे की व्हॉट्सअॅपवर फोटो शेअरिंग लगेच आणि विश्वासार्ह राहील याची खात्री करण्यासाठी, फोटो पाठवताना 'स्टँडर्ड क्वालिटी' हा डिफॉल्ट पर्याय राहील.

8. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना कमी-बँडविड्थ कनेक्टिव्हिटी असताना फोटो मिळाल्यास, ते चांगली आवृत्ती ठेवायची की HD वर हे सुद्धा फोटो-बाय-फोटो आधारावर निवडू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT