Tips To Calculate Your Ideal Weight saam tv
लाईफस्टाईल

Right Weight For Age : वयोमानानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? कसं मोजाल वय आणि वजनाचं गणित, पाहा चार्ट

Tips To Calculate Your Ideal Weight: प्रत्येकाने त्याच्या वजनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. यासाठी तुमच्या वयोमानानुसार, तुमचं वजन किती असलं पाहिजे हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे वजन वाढीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. आजच्या काळात जास्त वजन आणि लठ्ठपणाची समस्या खूप वेगाने वाढतेय. सतत जंक फूडच्या सेवनामुळे लोकांचे वजन असामान्यपणे वाढतंय. जर वजन वाढले तर मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब यासह अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे प्रत्येकाने त्याच्या वजनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. यासाठी तुमच्या वयोमानानुसार, तुमचं वजन किती असलं पाहिजे हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार, बॉडी मास इंडेक्स (BMI) हा तुमच्या वजन आणि उंचीनुसार शरीरातील फॅट मोजण्याचा एक सोपा मार्ग आहे. बीएमआय द्वारे, तुम्ही काही सेकंदात तुमचं वजन कमी आहे की जास्त आहे हे शोधू शकता. तुम्ही हे कसं मोजून घेऊ शकता, ते जाणून घेऊया.

कसा मोजाल BMI?

बीएमआय मोजण्याचं सूत्र खूप सोपं आहे. बीएमआय = वजन/उंची x उंची. यामध्ये तुमचं वजन किलोग्रॅममध्ये आणि उंची मीटरमध्ये असली पाहिजे. एका फूटात ०.३०४८ मीटर असतात तर एका इंचात ०.०२५४ मीटर असतात. जर तुमची उंची ५ फूट असेल तर त्यानुसार तुमची उंची १.५२४ मीटर असणार आहे. तुमची उंची तुमच्या उंचीने गुणा आणि नंतर तुमचे वजन निकालाने भागा. हे तुम्हाला तुमचा बीएमआय देईल.

BMI कॅटेगरीमध्ये करा चेक

  • अंडरवेट: BMI < 18.5

  • नॉर्मल: 18.5 ≤ BMI < 24.9

  • ओवरवेट: 25 ≤ BMI < 29.9

  • लठ्ठ: BMI ≥ 30

असं समजून घ्या BMI चं गणित

  • जर तुमचा बीएमआय १८.५ पेक्षा कमी असेल तर तुमचं वजन कमी आहे.

  • जर तुमचा बीएमआय १८.५ ते २४.९ च्या दरम्यान असेल तर तुमचं वजन सामान्य आहे.

  • जर तुमचा बीएमआय २५ ते २९.९ च्या दरम्यान असेल तर तुमचं वजन जास्त आहे.

  • जर तुमचा बीएमआय ३० किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्ही लठ्ठ आहात.

तुमच्या वयोमानानुसार किती असलं पाहिजे वजन?

  • ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं वजन वयानुसार वाढीच्या चार्टद्वारे निश्चित केलं जातं.

  • १८ ते २५ वर्षांपर्यंत चयापचय जलद असल्याने वजन सुमारे ५०-७० किलो असलं पाहिजे.

  • २६ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींचं वजन वाढण्याची शक्यता असते. या वयोगटातील सामान्य वजन ६०-८० किलो दरम्यान असावे.

  • ४१ ते ६० वयोगटात चयापचय क्रिया मंदावू लागते. त्यामुळे या वयात सामान्य वजन ६५-८५ किलो असलं पाहिजे.

  • ६१ वर्षे आणि त्याहून अधिक वयात स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि वजन साधारणपणे ६०-८० किलो दरम्यान असलं पाहिजे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT