दिवाळीच्या रात्री काही उपाय केल्याने घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो.
लाल कपड्यात बांधलेल्या शुभ वस्तूंमुळे धनाची आवक वाढते.
चांदीचे नाणे आणि कौड्या तिजोरीत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.
दिवाळीचा हा सण प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा सण मानला जातो. कार्तिक अमावस्येला साजऱ्या होणाऱ्या या सणाची उत्सुकता प्रत्येक घरात दिसून येते. या दिवशी घरं सजवली जातात, दिव्यांनी उजळवली जातात आणि लक्ष्मी, गणपती तसेच कुबेर यांची पूजा करून धन, धान्य आणि सुखाची प्रार्थना केली जाते. दिवाळीच्या रात्री काही खास उपाय केल्यास वर्षभर पैशांची तंगी येत नाही आणि घरात सदैव समृद्धी टिकून राहते, असे मानले जाते.
तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या रात्री तिजोरीत काही शुभ वस्तू ठेवल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. यासाठी लाल रंगाच्या स्वच्छ कापडात सुपारी, गुलाबाच्या काही पानांचा तुकडा आणि एक नाणे बांधून ठेवा. कापड लक्ष्मीमातेच्या मूर्तीसमोर ठेवून पूजा करावी आणि नंतर ते तिजोरीत ठेवावे. या उपायामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि धनवृद्धी होते.
तसेच तिजोरीत चांदीचे नाणे ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरात पैशांची कमतरता भासत नाही. ज्यांच्यावर कर्ज आहे, त्यांनीही दिवाळीच्या दिवशी एक सोपा उपाय करावा. त्या दिवशी तिजोरीत काही नवीन नोटा10, 50 100 रुपयांच्या ठेवाव्यात. या उपायामुळे आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते आणि कर्ज कमी होण्यास मदत होते.
दिवाळीच्या पूजेत पिवळ्या रंगाच्या कौड्या माता लक्ष्मीला अर्पण केल्या जातात. पूजा संपल्यानंतर त्या कौड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवाव्यात. असे केल्याने घरात धनलाभ होत राहतो. याशिवाय पीपळाच्या पानावर “ॐ” असे लिहून ते पान तिजोरीत ठेवणेही अत्यंत शुभ मानले जाते. या उपायामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि लक्ष्मीमातेची कृपा सदैव प्राप्त होते. दिवाळी ही फक्त दिव्यांचा उत्सव नाही, तर ती श्रद्धा आणि समृद्धीचा संगम आहे. त्यामुळे या शुभ रात्री श्रद्धेने केलेले छोटे उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात.
लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काय करावे?
लक्ष्मीची मनोभावी भक्ती करावी. त्याने आर्थिक स्थिरता मिळते आणि घरात समृद्धी कायम राहते.
कोणत्या वस्तू तिजोरीत ठेवाव्यात?
लाल कपड्यात बांधलेली सुपारी, गुलाबाची पाने, नाणे, चांदीचे नाणे, कौड्या आणि पीपळाचे पान या वस्तू शुभ मानल्या जातात.
दिवाळीत हे उपाय केव्हा करावेत?
कार्तिक अमावस्येच्या दिवशी, लक्ष्मीपूजा झाल्यानंतर तिजोरीत या वस्तू ठेवाव्यात.
या उपायांचे फायदे कोणते?
घरात पैशांची वाढ, कर्जातून सुटका आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन समृद्धी टिकून राहते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.