New LIC Policy: LIC ने लाँच केल्या २ जबरदस्त योजना! कमी प्रिमियमवर मिळणार भरघोस परतावा; वाचा संपूर्ण माहिती

LIC Policy: LIC ने 15 ऑक्टोबर 2025 पासून ‘LIC जन सुरक्षा’ आणि ‘LIC बीमा लक्ष्मी’ या दोन नवीन योजना लॉन्च केल्या आहेत. या योजना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बचत व विमाच्या सुविधा देतात.
LIC investment risks
LIC PolicySaam Tv
Published On

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा (LIC) ने दोन नवीन योजना लॉन्च केल्या आहेत. या योजना 15 ऑक्टोबर 2025 पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. एलआयसीने सोमवारी 14 ऑक्टोबरला एक्स्चेंज फाइलिंगच्या साहाय्याने या दोन्ही योजनांची घोषणा केली. या योजनांची नावे 'एलआयसी जन सुरक्षा (LIC Jan Suraksha)' आणि 'एलआयसी बीमा लक्ष्मी (LIC Bima Lakshmi)' अशी आहेत. दोन्ही योजना ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.

एलआयसी जन सुरक्षा योजना ही कमी प्रीमियमची योजना आहे. त्यातली खासियत म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या आणि लोअर मिडल क्लास वर्गातील लोकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही योजना नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटिंग आहे, म्हणजेच तिचा बाजारातील चढ-उतारांशी किंवा बोनसशी काही संबंध नाही. ही एक मायक्रो इन्शुरन्स योजना आहे. याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कमी खर्चात विमा संरक्षण मिळावे हा आहे. या योजनेत कमी हप्ते आणि परवडणारे प्रीमियम आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना विमा घेता येईल.

LIC investment risks
EPFO Rules: लग्नासाठी पीएफ खात्यातून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या EPFO चे महत्त्वाचे नियम

एलआयसी बीमा लक्ष्मी योजना

एलआयसी बीमा लक्ष्मी योजना ही जीवन विमा आणि बचत या दोन्हीचा एकत्रित लाभ देणारी योजना आहे. हीदेखील नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटिंग असल्याने बाजारातील अस्थिरतेचा यावर परिणाम होत नाही. या योजनेत जीवन कवचासोबतच मुदतपूर्तीनंतर एकरकमी रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच, ज्या लोकांना सुरक्षित बचत आणि विमा संरक्षण दोन्ही हवे आहेत, त्यांच्यासाठी ही योजना योग्य ठरेल.

या दोन योजनांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात एलआयसीच्या शेअर्समध्ये थोडी वाढ झाली. सोमवारी एलआयसीचा शेअर 904.15 रुपयांच्या उच्च पातळीवर आणि 893.45 रुपयांच्या कमी पातळीवर व्यवहार करत होता. मागील भाव 897.25 रुपये होता. एकूणच गेल्या एका वर्षात एलआयसीच्या शेअरमध्ये सुमारे 6 टक्क्यांची घसरण झाली असली तरी गेल्या सहा महिन्यांत जवळपास 17 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

LIC investment risks
Google AI Hub: गुगलची भारतात सगळ्यात मोठी गुंतवणूक; तब्बल होणार 1,331,879,040,000 रुपयांचं AI हब

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com