Sakshi Sunil Jadhav
दिवाळीत फराळाचे गोड धोड पदार्थ घराघरात दरवळतात. अनेकांना करंजी बनवताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तुम्ही पुढच्या टिप्स फॉलो करुन सुंदर खुसखुशीत करंजी तयार करु शकता.
नारळ किंवा खवा वापरत असाल तर ते आलं असतं. म्हणून ओलावा पूर्ण आटेपर्यंत परतून घ्या. ओलं सारण करंजी फुटण्याचं मुख्य कारण असतं.
मोहन म्हणजे गरम तेल किंवा तूप. मोहन जास्त असेल तर करंजी फुटते, कमी असेल तर कडक होते.
पिठ मळल्यावर व्यवस्थित झाकून ठेवा. १५ ते २० मिनिटं झाकून ठेवल्याने ते मऊ आणि लवचिक होतं.
जास्त सारण भरल्याने कडा नीट बंद होत नाहीत आणि करंजी तेलात उघडू शकते.
पाण्याने किंवा दुधाने कडा हलक्या ओल्या करून नीट दाबा. हवे असल्यास काट्याने डिझाइन द्या.
तेल खूप गरम असेल तर करंजी बाहेरून जळते आणि आतून कच्ची राहते.
तेलाचं तापमान टिकवण्यासाठी थोड्याथोड्या करंज्या तळा. जास्त करंजा तळणे टाळा. त्याने तेलाचे तापमान बिघडते.
करंज्या पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरा. त्याने करंज्या कुरकुरीत राहतात आणि मऊ पडत नाहीत.