Sakshi Sunil Jadhav
चेहऱ्यावरील Pigmentation किंवा Freckles याने फक्त दिसण्यात बदल दिसत नाहीत, तर त्वचेच्या आरोग्यावरही परिणाम करतात.
Pigmentation सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल, वय वाढणे किंवा चुकीच्या स्किनकेअरमुळे होऊ शकतात. पण काळजी करू नका काही नैसर्गिक उपायांनी हे मुळापासून कमी करता येतं.
लिंबात असलेले नैसर्गिक ब्लिचिंग एजंट त्वचेवरचे काळे डाग कमी करतात. एका चमचा मधात थोडा लिंबाचा रस मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.
काकडी त्वचेला थंडावा देते आणि टॅनिंग कमी करते. रोज सकाळी आणि रात्री चेहऱ्यावर काकडीचा रस लावल्यास पिगमेंटेशन कमी होते.
बटाट्यातले एन्झाईम त्वचेला उजळवतात. बटाट्याचा स्लाइस घेऊन चेहऱ्यावर हलकं घासा आणि १० मिनिटांनी धुवा.
अॅलोवेरामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात आणि पिग्मेंटेशन कमी करतात. झोपण्यापूर्वी ताजं जेल लावा.
हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुण आणि दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला उजळवतात. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरा.
सफरचंद व्हिनेगरमध्ये असलेले अॅसिड पिग्मेंटेशनवर परिणामकारक ठरते. पाण्यात मिसळून रोज चेहरा धुवा.
झाया वाढू नयेत यासाठी रोज SPF 30+ सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे.