Sakshi Sunil Jadhav
चाणक्यांच्या मते, अति अपेक्षा हे दुःखाचं मूळ असतं. अपेक्षा कमी ठेवा, समाधान वाढेल.
राग, लोभ, मत्सर आणि वासना या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने शांत राहू शकतो.
वाईट लोकांच्या संगतीमुळे मन अस्थिर होतं. चांगल्या आणि सकारात्मक विचारांच्या लोकांमध्ये राहा.
चाणक्यांच्या मते शिक्षण आणि अनुभव हे मनुष्याचं खऱ्या अर्थाने धन आहे. सतत शिकत राहा.
इतरांशी स्पर्धा करत जगल्याने मनातला असंतोष वाढतो. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा.
जे मिळालंय त्याबद्दल आभार मानणं हे आनंदाचं रहस्य आहे. छोट्या गोष्टींमध्येही आनंदात राहता येतं.
प्रत्येक गोष्ट उशीराच घडते. घाई न करता संयम ठेवणं हे सुखाचं एक प्रमुख सूत्र आहे.
खोटेपणा, फसवणूक आणि अन्याय यामुळे अंतर्गत अस्वस्थता वाढते. प्रामाणिक राहिल्यास मनःशांती मिळते.
ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतन यामुळे मन शांत होतं आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते.