Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

ढोकळ्याचा नाश्ता

घरी नाश्तासाठी ढोकळा हा सगळ्यांच्या आवडीचा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. बनवायला सोपा आणि कमी साहित्यात ढोकळा तयार केला जातो.

Fluffy Dhokla | google

फिस्कटलेला ढोकळा

बऱ्याच वेळेस ढोकळा लवकर सुकत नाही, कधी फुलत नाही, चपटा होतो, सॉफ्ट होत नाही,यासाठी तुम्ही पुढील सोप्या आणि हटके टिप्स वापरु शकता.

Gujarati dhokla | google

बेकिंग सोडा

जास्त प्रमाणात वापरल्यास ढोकळा पटकन फुगतो पण नंतर बसतो. कमी वापरल्यास तो फुलत नाही.

Gujarati dhokla | google

बॅटर घट्ट ठेवा

खूप पातळ किंवा खूप जाड मिश्रण केल्यास ढोकळा चपटा होतो.

Gujarati dhokla | google

बॅटर फेटून

बॅटरमध्ये हवा मिसळल्याने ढोकळा हलका आणि फुलका होतो. हाताने किंवा विस्कने २-३ मिनिटे फेटा.

instant dhokla | google

ईनोचा वापर

वाफवण्याच्या अगोदरच ईनो टाकून लगेच ढोकळा स्टीमरमध्ये ठेवा. त्यामुळे हवा आत अडकते आणि ढोकळा स्पंजी होतो.

instant dhokla | google

स्टीमरमधील पाणी

थंड पाण्यात ढोकळा ठेवला तर मिश्रण सेट होण्यापूर्वीच वाफ कमी येते आणि तो नीट फुलत नाही.

eno in dhokla | google

स्टीमिंग टाइम

साधारण १५-२० मिनिटे मध्यम आचेवर वाफवा. जास्त वेळ ठेवल्यास ढोकळा कोरडा होतो.

eno in dhokla | google

झाकणावर कपडा ठेवा

वाफेचे थेंब ढोकळ्यावर पडल्यास तो ओलसर आणि चपटा होतो. म्हणून झाकणाखाली स्वच्छ कपडा ठेवा.

dhokla | yandex

NEXT: तीन पदरी घडीची चपाती कशी करायची? मऊ-लुसलुशीत टम्म चपात्यांसाठी खास टिप्स

soft chapati tips | google
येथे क्लिक करा