Sakshi Sunil Jadhav
घरच्या घरी बनवलेली तीन पदरी चपाती म्हणजे चवीत आणि मऊपणात हटके असते. या पोळ्या बनवताना काही छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर त्या बाजारातील पराठ्यांपेक्षाही मऊ आणि स्वादिष्ट होतात.
पीठ मळताना कोमट पाणी वापरा यामुळे पीठ मऊ आणि सॉफ्ट बनेल.
थोडं तेल किंवा तूप पिठात मिक्स करा. त्याने पोळ्या चिकट होत नाहीत आणि पदर सुटतात.
मळलेले पीठ अर्धा तास झाकून ठेवा त्यामुळे ग्लुटन सेट होतो आणि पोळी फुलते.
लाटताना समान जाडी ठेवा पोळी कुठेही जाड पातळ झाली तर पदर नीट तयार होत नाहीत.
घडी करताना तेल लावा यामुळे थर एकमेकांना चिकटत नाहीत.
तीन पदरी घडी करा अर्धी पुन्हा अर्धी, अशा प्रकारे तीन थर तयार होतात. तव्यावर स्लो गॅसवर शेकून घ्या फास्ट गॅसवर शेकवल्यास पोळी वातड होते.