Sakshi Sunil Jadhav
आजकाल तरुण असो वा वृद्ध पांढऱ्या केसांच्या समस्यांना सगळ्यांनाच सोमोरं जावं लागत आहे.
कामाचा ताण, कामासाठी धावपळ, चुकीचा आहार या सगळ्याचा परिणाम थेट तुमच्या केसांवर दिसतो.
केस खूप कोरडे पडतात, पांढरे होतात, खूप गळतात, स्कॅल्पवर अॅलर्जी येऊ शकते. पुढे आपण यावर रामबाण उपाय जाणून घेणार आहोत.
सगळ्यात आधी तुम्ही केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून केमिकल युक्त शॅम्पू किंवा अन्य प्रोडक्ट वापरत असाल तर ते थांबवा.
पांढऱ्या केसांसाठी हिना मेंहदी लावू शकता. ती रात्रभर भिजत ठेवून सकाळी वापरा.
एक एक पाण्यात दोन चमचे चहापूड उकळवून केसांना लावा. त्याने केस काळेभोर आणि चमकदार होतील.
केसांना प्रोटीन देण्यासाठी अंड्याचा आतला पांढरा भाग लावू आणि सौम्य शॅम्पूने केस धुवा.
अॅलोवेरा जेलने तुम्ही केसांना व्यवस्थित मसाज आणि केस धुवा. हा उपाय तुम्ही रोज करु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.