Sakshi Sunil Jadhav
दरवर्षी दिवाळी या सणाला भारतात फराळात चकल्या, चिवडा, शंकरपाळ्या, कंरजी हे पदार्थ हमखास करतात.
फराळ हा नाश्त्यासाठी आपण खातो, पण जेवणासाठी सणावारांना स्पेशल काय बनवू शकतो? याबद्दल पुढे जाणून घेऊ.
दिवाळी हा सण ५ दिवसांचा असतो. त्यामुळे घरात सतत पाहूणे जेवणासाठी येत असतात.
तुम्ही धनत्रयोदशीला जेवणासाठी तुम्ही डाळ कचोरी आणि मसालेदार बटाट्याच्या भाजीचा बेत करु शकता.
दुसऱ्या दिवशी तुम्ही नाश्त्यात जिलेबी, सांबार, इडली, नारळाची चटणी हा बेत करु शकता. जेवणासाठी तुम्ही मटर पनीरची भाजी आणि पुऱ्या किंवा नान तयार करु शकता.
तुम्ही दिवाळीला वेज किंवा नॉन वेज बिर्याणी तयार करु शकता. सोबत कोशिंबीर तयार करा.
तुम्ही वसुवारसला घरातल्या घरात व्हेज पुलाव तयार करु शकता. किंवा पालक पनीर हा उत्तम पर्याय आहे.
शेवटच्या दिवशी तुम्ही चायनीज, नुडल्स तयार करु शकता. हा लहान मुलांना आवडणारा पदार्थ आहे.