Real Causes of Hair Fall google
लाईफस्टाईल

Hair Fall Tips: केस गळतीमागचं खरं कारण काय? तज्ज्ञ सांगतात या सवयी लगेचच थांबवा, नाहीतर...

Hair Care: केस गळतीमागील खरं कारण जाणून घ्या. आहार, झोप, तणाव आणि सवयी यांचा केसांवर कसा परिणाम होतो ते तज्ज्ञांच्या सल्ल्याने समजून घ्या आणि नैसर्गिक उपायांनी केस निरोगी ठेवा.

Sakshi Sunil Jadhav

केसांची वाढ थांबणे किंवा केस गळणे ही समस्या आज अनेकांना जाणवते. सुंदर, दाट आणि निरोगी केस मिळवण्यासाठी फक्त केसांची काळजी पुरेशी नसते, तर शरीरात आवश्यक पोषक तत्त्वांचा समतोल, चांगली झोप आणि तणावमुक्त जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची असते. चुकीच्या सवयी, असंतुलित आहार आणि काही वैद्यकीय स्थितीमुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो आणि वाढ खुंटते. पुढे याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

चुकीच्या आहारामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे मिळत नाहीत. या पोषक तत्त्वांच्या अभावामुळे केसांच्या फॉलिकल्सची कार्यक्षमता कमी होते आणि नवीन केस तयार होण्याची प्रक्रिया थांबते. केसांच्या वाढीसाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे हे इंधनासारखे काम करतात, त्यामुळे पौष्टिक आहार घेणे खूप आवश्यक आहे.

कमी झोपेमुळेही केसांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या वेळी शरीर पेशींची पुनर्रचना करुन त्वचा तसेच केसांच्या मुळांची नवी वाढ करते. अपुरी झोप घेतल्यास केस गळणे, कोरडेपणा आणि त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

काही वैद्यकीय कारणांमुळे देखील केस गळती वाढते. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या स्थितींमुळे शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. ज्याचा थेट परिणाम टाळू आणि केसांवर दिसतो. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

स्ट्रेस हा केसांच्या आरोग्याचा आणखी एक मोठा शत्रू आहे. मानसिक तणावामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतं, ज्यामुळे केस गळती वाढते. याशिवाय, वारंवार केमिकल ट्रीटमेंट्स जसे की ब्लीचिंग, स्ट्रेटनिंग, कर्लिंग किंवा रंग लावणे केल्याने केसांच्या मुळांची ताकद कमी होते. या रासायनिक प्रक्रियांमुळे केस निस्तेज, तुटके होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ६ लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० बंद; आदिती तटकरेंनी कारणच सांगितलं

Liver Health : फॅट लॉस ते लिव्हर Detox; 'ही' कॉफी रोज प्या, तब्येत राहिल फिट, सगळे आजार छुमंतर

Buldhana : लोणार सरोवराच्या पाण्यात निर्माण झाली सजीव सृष्टी, पर्यावरणासह मानवलाही धोका?

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे यांचा घातपाताचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Overthinking : तुम्हीपण खूप Overthinking करताय? मग 'या' सिक्रेट टिप्स आहेत तुमच्या फायद्याच्या, माईंड होईल रिलॅक्स

SCROLL FOR NEXT