Hair Growth Tips: कापलेले केस वाढत नाहीत? मग या टिप्सचा लगेचच करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

केस गळती

केस गळणे ही आजच्या काळातील एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. प्रदूषण, ताणतणाव, चुकीचा आहार आणि केमिकलयुक्त उत्पादने या सगळ्यांचा परिणाम थेट आपल्या केसांवर होतो.

Hair Care

नैसर्गिक उपाय

काही नैसर्गिक घरगुती उपाय नियमितपणे केल्यास केस पुन्हा दाट आणि निरोगी वाढू शकतात. चला, जाणून घेऊया.

Hair Care

स्काल्प मसाज करा

दररोज फक्त ३ ते ५ मिनिटे बोटांच्या टोकांनी स्काल्प मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते. हळूहळू केसांची वाढ वेगाने होऊ लागते आणि केस दाट दिसतात.

hair care

आहारातून पोषण मिळवा

केसांच्या आरोग्यासाठी योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक जेवणात प्रोटीनचा समावेश करा आणि लोह, झिंक, तसेच बी-विटॅमिन्सची पूर्तता करा. हे घटक केसांच्या वाढीच्या नैसर्गिक टप्प्याला मजबूत करतात.

Hair Care

रोजमेरी तेल वापरा

थोडं रोजमेरी एसेन्शियल ऑईल नारळाच्या किंवा जोजोबा तेलात मिसळा आणि आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांच्या मुळांवर मालिश करा. यामुळे केसांची वाढ सुधारते आणि स्काल्पचे आरोग्य टिकते.

Natural Hair Care | google

अॅलोवेरा जेल वापरा

केस धुण्यापूर्वी ताजं अॅलोवेरा जेल १५ ते २० मिनिटांसाठी स्काल्पवर लावा. हे नैसर्गिकरित्या स्काल्पला शांत करते, कोंडा आणि बिल्डअप कमी करते तसेच केसांच्या मुळांना बळकटी देते.

natural hair care | google

केस तुटणे कमी करा

दररोज केस सुलभपणे विंचरा. वाइड-टूथ कंगवा वापरा, घट्ट हेअरस्टाईल टाळा आणि केस पुसताना मायक्रोफायबर टॉवेल वापरा.

hair care

संयम ठेवा

या सर्व उपायांचा परिणाम दिसण्यासाठी थोडी संयम बाळगा. केस नैसर्गिकरीत्या हळूहळू वाढतात.

Hair Care | google

NEXT: मित्रांसोबत दिवाळीत गोवा ट्रीप प्लान करताय? वाचा स्वस्तात मस्त बजेट प्लान

budget Goa trip | google
येथे क्लिक करा