Sleep Alert: रात्री १ ते ३ दरम्यान अचानक जाग येतेय? असू शकतो या आजाराचा धोका

Night Awakening: रात्री वारंवार झोपमोड होत असेल तर ते लिव्हरच्या कार्याशी संबंधित असू शकते. वाढता तणाव, वय, औषधे आणि झोपेचे विकारही कारणीभूत ठरतात. तज्ज्ञांचे उपाय जाणून घ्या.
Liver Might Be in Trouble
Waking Up Frequently at Nightgoogle
Published On
Summary

रात्री झोपमोड होणे हे लिव्हरच्या आरोग्याशी थेट जोडलेले असू शकते.

वाढते वय, तणाव आणि औषधे झोपेवर नकारात्मक परिणाम करतात.

झोपेतील अडथळे दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.

मानवी आरोग्यासाठी दररोज ६ ते ८ तासांची शांत झोप खूप आवश्यक असते. झोप शरीराला फ्रेश करते आणि दिवसभर ऊर्जावान ठेवते. मात्र झोपेत वारंवार अडथळे येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. अनेकांना रात्री मध्येच जाग येते, पुन्हा झोप लागत नाही यामागे अनेक आरोग्यदायी आणि मानसिक कारणे असू शकतात.

कमी झोपेची मुख्य कारणे

वाढते वय

झोपेच्या अडथळ्याचे एक प्रमुख कारण म्हणजे वाढते वय. वय वाढल्यावर शरीराची झोपेची पद्धत बदलते आणि रात्री वारंवार जाग येते. ही एक सामान्य तक्रार आहे असे आपण म्हणू शकतो. तज्ज्ञ सांगतात की वयानुसार झोप कमी होत जाते आणि त्यामुळे गाढ झोप मिळणे कठीण होते.

Liver Might Be in Trouble
Silver Rate: चांदीच्या किंमती ३ लाखांचा पल्ला गाठणार, दिवाळीच्या सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार, तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय?

वाढता तणाव

तणाव हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. मानसिक ताणतणावामुळे शरीरातील मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे झोपेतून अचानक जाग येऊ शकते. सततची चिंता, कामाचा ताण किंवा वैयक्तिक समस्या हे घटक झोपेचा दर्जा कमी करू शकतात.

औषधांचे सेवन

काही औषधांच्या वारंवार सेवनामुळे देखील झोपेवर परिणाम होतो. सर्दी, डिप्रेशन किंवा औषधांमुळे शरीरात अस्वस्थता निर्माण होऊन झोपेत अडथळा येऊ शकतो.

लिव्हरचा धोका

रात्री विशेषतः १ ते ३ वाजता जाग येणे हे लिव्हरशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते. लिव्हरची कार्यक्षमता कमी झाल्यास रक्तप्रवाहात अडथळे येतात आणि त्यामुळे झोपेत व्यत्यय येतो. शिवाय, तणावामुळे लिव्हरच्या कार्यावरही प्रतिकूल परिणाम होतो.

Liver Might Be in Trouble
Hair Growth Tips: कापलेले केस वाढत नाहीत? मग या टिप्सचा लगेचच करा फॉलो

त्याचप्रमाणे, गॅस्ट्रिक समस्या, डिप्रेशन, न्युरोपथी, रजोनिवृत्ती, प्रोस्टेट वाढ, थायरॉईड विकार आणि स्लीप एपनिया , झोपेत श्वास घ्यायला त्रास होणे, यांसारख्या अनेक आरोग्याच्या अडचणींमुळे झोप तुटू शकते. रात्री झोपेतून जाग येण्याची ही समस्या सतत जाणवत असल्यास ती दुर्लक्ष करू नये. जीवनशैलीत बदल करणे, तणाव कमी करणे, संतुलित आहार घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Q

रात्री वारंवार झोपमोड होण्याची कारणे काय असू शकतात?

A

वाढते वय, तणाव, औषधांचे सेवन, मानसिक ताणतणाव आणि लिव्हरच्या कार्यातील बिघाड.

Q

लिव्हर खराब झाल्यास झोपेवर कसा परिणाम होतो?

A

लिव्हरची कार्यक्षमता कमी झाल्यास रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि शरीर अस्वस्थ होते, त्यामुळे झोपेत अडथळा येतो.

Q

तणाव झोपेमध्ये अडथळा का आणतो?

A

तणावामुळे मेंदूतील हार्मोन्स असंतुलित होतात, हृदयाचे ठोके वाढतात आणि झोप पूर्ण होत नाही.

Q

झोप सुधारण्यासाठी काय उपाय करता येतील?

A

तणाव कमी करणे, हलका आहार घेणे, झोपेपूर्वी स्क्रीन टाइम कमी करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com