आज स्मार्टफोन ही आपली गरज बनली आहे. आपण स्मार्टफोन वेगवेगळ्या कामांसाठी वापरतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत जवळपास सगळेच स्मार्टफोन वापरतात. तथापि, बहुतेक लोकांना स्मार्टफोनच्या सर्व फीचर्सबद्दल योग्य माहिती नसते. असे बरेच वापरकर्ते आहेत ज्यांना या फीचर्सबद्दल माहिती आहे, परंतु ते वापरण्यास संकोच करतात किंवा त्यांना हे माहित नसते की कोणते फीचर (Features) कोणत्या हेतूसाठी कार्य करते. या फीचर्समध्ये (Features) रीबूट आणि रीस्टार्ट समाविष्ट आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अनेकजण स्मार्टफोनमधील (Smartphone) या दोन फीचर्सचा नेहमी वापर करतात, परंतु त्यांना दोन फीचर्समधील फरक माहित नाही. त्यांना हे फीचर्स काय आहे हे माहित नसते? रीबूट आणि रीस्टार्ट यात काय फरक आहे हे तुम्हालाही माहित नसेल तर काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला त्यांच्यातील फरक सांगणार आहोत.
रीबूटचा अर्थ सोप्या भाषेत समजून घ्या
रीबूट कोणत्याही उपकरणाच्या हार्डवेअरला नॉन-फंक्शनिंग स्टेटमधून ऑपरेशनल स्थितीत बदलते. रीबूट अनेकदा डिव्हाइस सुरू करण्यासाठी वापरले जाते. त्याचे काम फोन चालू करणे आहे. साधारण फोन हँग होणे किंवा कोणत्याही अॅपला प्रतिसाद न देणे अशा अनेक कारणांमुळे रीबूट होऊ शकतो.
रीस्टार्ट चा अर्थ सोप्या भाषेत समजून घ्या
रीस्टार्ट करणे म्हणजे डिव्हाइस बंद करणे आणि नंतर ते पुन्हा चालू करणे. याशिवाय, डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये बदल केल्यानंतर, ते रीस्टार्ट केले जाते. तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर फर्मवेअर किंवा सॉफ्टवेअर अपग्रेड करता, तेव्हा तुम्हाला फोन रीस्टार्ट करण्यास सांगितले जाते.
फोन रीस्टार्ट करण्यापेक्षा जलद रीबूट होऊ शकतो. याचे मुख्य कारण असे आहे की फोन बंद करणे आणि तो पुन्हा चालू करण्यासाठी अधिक वेळ लागतो, तर रीबूट करण्यासाठी बरेच टप्पे सोडले जातात आणि ते जलद होते.
रीबूट आणि रीस्टार्ट मधील मूलभूत फरक
जेव्हा फोन बंद होतो, तेव्हा सिस्टम आणि हार्डवेअर देखील पूर्णपणे बंद होतात. अशा स्थितीत, जेव्हा तुम्ही फोन रीस्टार्ट करता, तेव्हा फोनच्या सर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची पुन्हा चाचणी केली जाते आणि ते डेटा देखील रीलोड करते. शिवाय, पूर्ण वेगाने काम करणारे CPU अधिक उर्जा वापरेल. तथापि, रीबूट केल्याने केवळ फोनचे सॉफ्टवेअर सुरू होते. हे आपोआप काही पायऱ्या वगळते आणि थेट ऑपरेटिंग सिस्टम इंटरफेसमध्ये प्रवेश करते, त्यामुळे वीज बचत होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.