WhatsApp वापरकर्त्यांचा अनुभव सतत अपडेत करतो. यासाठी कंपनी नवीन फीचर्स आणि अपडेट्स आणत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने चॅनल फीचर आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडले होते. याद्वारे वापरकर्ते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींशी थेट कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांच्या अॅक्टिव्हिटी बद्दल अपडेट (Update) राहू शकतात. आता कंपनी लवकरच एक नवीन फीचर देणार आहे ज्यानंतर यूजर्स अॅपमध्ये इन्स्टाग्रामसारखे त्यांचे यूजरनेम देखील निवडू शकतील.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरकर्त्यांना लवकरच अॅप्लिकेशनमध्ये युजरनेम तयार करण्याचा पर्याय मिळणार आहे. कंपनी सध्या या फीचरची चाचणी करत आहे.
व्हॉट्सअॅपच्या या फीचरची माहिती कंपनीवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo ट्विटरवर दिली आहे. या फीचरबाबत समोर आलेल्या रिपोर्टनुसार, काही बीटा यूजर्सना हे फीचर iOS 23.20.1.71 च्या अपडेटमध्ये मिळाले आहे. यापूर्वी अँड्रॉइडबाबतही असेच अपडेट समोर आले होते.
तसेच व्हॉट्सअॅप लवकरच AI स्टिकर्सचे हे नवे फीचर (Feature) सुद्धा लॉन्च करणार आहे. त्यात तुम्ही स्वतःचे AI स्टिकर्स तयार करू शकता. तुमच्या पद्धतीने नव्या विचारांना चालना देऊन नवे स्टिकर तयार करण्यासाठी AI ला प्रश्न विचारू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.