आता तुमचे WhatsApp Status दोन दिवस दिसणार, काय आहे नवीन फीचर पाहाचं

WhatsApp New Feature : चॅटिंग, कॉलिंग आणि फाईल शेअरिंगसोबतच लोक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसचाही आवडीने वापर करतात.
WhatsApp Status Update
WhatsApp Status UpdateSaam Tv
Published On

WhatsApp Status New Update :

भारतातील जवळपास सर्वच लोक ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत तेही व्हॉट्सअ‍ॅप वापरतात, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप हे असे मेसेजिंग अ‍ॅप बनले आहे की आपण जवळजवळ सर्वच मोबाइल वापरकर्ते ते वापरतात.

चॅटिंग, कॉलिंग आणि फाईल शेअरिंगसोबतच लोक व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) स्टेटसचाही आवडीने वापर करतात आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी पोस्ट करतात. बातमी येत आहे की कंपनी एका नवीन फीचर अपडेटवर काम करत आहे, ज्यानंतर WhatsApp स्टेटस केवळ 24 तासच नाही तर 2 आठवड्यांसाठी दिसेल.

WhatsApp Status Update
WhatsApp Not Support Android Version: एंड्रॉइड युजर्सला झटका! या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद, तुमचा फोन आहे का यात?

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अपडेटशी संबंधित ही मोठी बातमी Wabetainfo च्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की मेटा कंपनी व्हॉट्सअ‍ॅपच्या आगामी व्हर्जनमध्ये काही नवीन फीचर्स (Features) सादर करण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप स्टेटससाठी (Status) 'टाइम ड्युरिएशन'चा पर्यायही दिला जाऊ शकतो. हा पर्याय आल्यानंतर, व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस किती तास किंवा किती दिवस लाइव्ह राहील हे ठरवू शकतील.

WhatsApp स्थिती वेळ मर्यादा

24 तास

3 दिवस

1 आठवडा

2 आठवडा

रिपोर्टमध्ये स्क्रीनशॉट शेअर करताना असे म्हटले आहे की, नवीन अपडेटनंतर ग्राहकांना त्यांचे स्टेटस किती काळ लाइव्ह ठेवायचे आहे याचे चार पर्याय मिळतील. यामध्ये 24 तास, 3 दिवस, 1 आठवडा आणि 2 आठवडे कालावधीचा समावेश असेल. रिपोर्टनुसार, हे फीचर अँड्रॉइड 2.23.20.12 अपडेटसाठी WhatsApp बीटामध्ये उपलब्ध असेल आणि नंतर इतर आवृत्त्यांमध्ये आणले जाईल.

WhatsApp Status Update
WhatsApp New Feature : आता WhatsApp नेही करता येईल पेमेंट, जाणून घ्या कसं...

व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनच्या फोटोमध्ये असे दिसून येते की कंपनीचे हे नवीन अपडेट आधी फक्त टेक्स्ट स्टेटससाठी आणले जाईल. याचा अर्थ सुरुवातीला 24 तास ते 2 आठवड्यांचा वेळ फक्त मजकूर स्टेटससाठी दिला जाऊ शकतो आणि फोटो किंवा व्हिडिओसह व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फक्त 24 तास ठेवता येतात. मात्र, सध्या नवीन व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अपडेटबाबत मेटाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com