Connected Car Features: 'कनेक्टेड कार' फीचर काय आहे? जो कारला सामान्य वाहनापेक्षा करतो वेगळा, जाणून घ्या...

Benefits of Connected Car Features: 'कनेक्टेड कार' फीचर काय आहे? जो कारला सामान्य वाहनापेक्षा करतो वेगळा, जाणून घ्या...
Connected Car Features
Connected Car FeaturesSaam Tv
Published On

What Is Connected Car Features ? :

अलीकडे लॉन्च झालेल्या कार्समध्ये अनेक जबरदस्त फीचर्स असल्याचं पाहायला मिळतं. यातच वाहन उत्पादक कंपन्यांनी बाजारात अशा कार सादर केल्या आहेत, ज्यात काही खास फीचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर्स कारला सामान्य वाहनापेक्षा वेगेळे करतात. यातच एक फीचर आहे ते म्हणजे 'कनेक्टेड कार'.

तंत्रज्ञानामुळे आधुनिक कार अधिक स्मार्ट होत आहेत. कनेक्टेड कार तंत्रज्ञान कोणत्याही कारला स्मार्ट डिव्हाइसमध्ये बदलते. तंत्रज्ञानामुळे कारमध्ये वापरल्या जाणार्‍या फीचर्सचा वापर करणे खूप सोपे होते.

Connected Car Features
RBI Rule: एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते? जाणून घ्या काय आहे नियम...

या फीचरचे काय आहेत फायदे?

कनेक्टेड कार फीचरचे अनेक फायदे आहेत. जर तुमच्याकडे या तंत्रज्ञानाची कार असेल तर तुम्ही तुमची कार लांब असतानाही सुरू करू शकता. गाडीचा एसीही अगोदर चालू करता येतो. यासोबतच गाडीचे सनरूफ आधीच उघडायचे असेल तर अशी अनेक कामे सहज करता येतात. (Latest Marathi News)

एका रिपोर्टनुसार, देशभरात कनेक्टेड फीचर्स असलेल्या कारची मागणी वाढत आहे. 2021 पर्यंत देशातील सुमारे 35 टक्के कारमध्ये या फीचरची मागणी होती. त्यानंतर 2022 मध्ये ही संख्या 46 टक्के झाली. 2023 मध्ये ही संख्या 63 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज आहे.  (Utility News)

Connected Car Features
Share Market News: गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील आजचा दिवस ठरला काळा, काही तासांतच तब्बल 2.5 लाख कोटी बुडाले...

सामान्य कारमध्ये फक्त पारंपारिक फीचर्स दिली जातात. पण कनेक्टेड कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले जात आहेत. फीचर्ससोबतच हे सुरक्षेच्या दृष्टीनेही उपयुक्त आहेत. ज्यामुळे कार चालवणे सोपे होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com